घरमहा @२८८विले-पार्ले विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १६७

विले-पार्ले विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १६७

Subscribe

विले पार्ले (विधानसभा क्र. १६७) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातला विलेपार्ले हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. जुन्या काळी या भागात असलेल्या विर्लेश्वर आणि पार्लेश्वर या दोन मंदिरांच्या नावावरून विले-पार्ले हे नाव पडल्याचं सांगितलं जातं. मुंबई उपनगरामधल्या मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय मतदारांचं प्राबल्य या मतदारसंघात दिसून येतं. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच मतदारसंघात येतं. मराठी भाषिकांचं प्रमाण इथे जास्त आहे. जो काम करेल, त्याला मत मिळेल या न्यायानुसार या मतदारसंघात कधीही कोणत्या पक्षाची सद्दी राहिलेली नाही. भाजप, काँग्रेस, शिवसेना, जनता पक्ष, कधी अपक्ष अशा प्रत्येकालाच इथल्या मतदारानं संधी दिली आहे. या मतदारसंघात २७७ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १६७

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,५१,६४४
महिला – १,३४,५१४

- Advertisement -

एकूण मतदार – २,८६,१५८


parag alavani
पराग अळवणी

विद्यमान आमदार – पराग अळवणी, भाजप

२०१४मध्ये विधानसभेवर निवडून जाण्यापूर्वी पराग अळवणी प्रामुख्याने मुंबई महानगर पालिकेच्या राजकारणामध्ये सक्रीय होते. १९९७ ते २००७ या १० वर्षांच्या कालावधीत अळवणी मुंबई महानगर पालिकेमध्ये आधी भाजपचे नगरसेवक आणि नंतर गटनेते म्हणून कार्यरत होते. २०१४मधल्या मोदी लाटेमध्ये पहिल्यांदाच पराग अळवणी विधानसभेवर निवडून आले. ऑक्टोबर १९८९मध्ये मिठीबाई कॉलेजमध्ये लॉच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या ओवेन डिसोझा या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी अळवणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, २००२मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) पराग अळवणी, भाजप – ७४,२७०
२) शशिकांत पाटकर, शिवसेना – ४१,८३५
३) कृष्णा हेगडे, काँग्रेस – २४,१९१
४) सुहास शिंदे, मनसे – ५८८२
५) पिमेंटा गॉडफ्रे, अपक्ष – १७३३

नोटा – १५१३

मतदानाची टक्केवारी – ५२.९८ %


हेही वाचा – मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -