वणी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७६

यवतमाळ जिल्ह्यातील वणी (विधानसभा क्र. ७६) विधानसभा मतदारसंघ आहे.

Yavatmal
wani assembly constituency
वणी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ७६

यवतमाळ जिल्ह्यातील वणी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. वणी मतदारसंघात २००४ आणि २०१४ चा अपवाद वगळता या मतदारसंघाने १९९० पासून काँग्रेसलाच झुकते माप दिले होते. मात्र १९९० पासून काँग्रेसच्या मताधिक्यात सातत्याने घसरण पाहिलेली आहे. १९९९ साली राष्ट्रवादीतर्फे संजय देरकरांनी निवडणूकीत भाग घेतला होता.

सध्या वणीच्या काँग्रेसमध्ये राजकीय उदासिनता दिसल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी वणीची राष्ट्रवादी काँग्रेस विसर्जित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या डॉ. महेंद्र लोढा यांनी वणी मतदारसंघात पुन्हा आपले वजन वाढविले आहे. धनंजय मुंडे हे देखील या मतदारसंघात फिरून राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.

मतदारसंघ क्रमांक – ७६

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४१,४७३
महिला – १,२७,३७६

एकूण मतदान – २,६८,८५०

विद्यमान आमदार – संजीव रेड्डी बोदकुरवार, भाजप

यवतमाळ जिल्ह्यातून काँग्रेसमुक्त करण्याचे काम भाजपचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे. संजीव रेड्डी यांनी २०१४ साली पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले.

Wani MLA Sanjeev Reddy Bodkurwar
वणी मतदारसंघाचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) संजीव रेड्डी बोदकुरवार, भाजप – ४५,१७८
२) विश्वास नांदेकर, शिवसेना – ३९,३८६
३) वामनराव कासवार, काँग्रेस – ३८,७९२
४) संजय देरकर, राष्ट्रवादी – ३०,९८३
५) राजू उंबरकर, मनसे – २६,९९३

हे वाचा – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ