वाशिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३४

वाशिम जिल्ह्यातील वाशिम (विधानसभा क्र. ३४) विधानसभा मतदारसंघ आहे.

Washim
washim assembly constituency
वाशिम विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ३४

वाशिम जिल्ह्यातील वाशिम हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. वाशिम विधानसभा मतदारसंघ १९६७ पासून अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याआधी तो खुला मतदारसंघ होता. काँग्रेसने सलग ३० वर्ष मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली होती. १९९० साली भाजपने काँग्रेसचा हा गड पोखरला तो सध्याचे विद्यमान आमदार लखन मलिक यांच्या रुपाने. १९९० पासून २००४ पर्यंत भाजपचे इथे वर्चस्व होते.

२००४ साली लखन मलिक यांचे तिकीट भाजपने कापले त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतविभाजन होऊन तिथे काँग्रेसचे सुरेश इंगळे विजयी झाले. २००९ साली पुन्हा एकदा भाजपने लखन मलिक यांनाच उमेदवारी दिली. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत लखन मलिक विजयी झाले होते. भाजपची सत्ता असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित असल्याचे येथील मतदार सांगतात.

मतदारसंघ क्रमांक – ३४

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,७०,३६५
महिला – १,५५,४१६

एकूण मतदान – ३,२५,७८५

विद्यमान आमदार – लखन सहदेव मलिक, भाजप

लखन सहदेव मलिक हे वाशिम मतदारसंघातून १९९०, १९९५, २००९ आणि २०१४ असे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. या विधानसभेत सर्वात कमी शिकलेले आमदार म्हणून त्यांची गनणा होते. मलिक यांचे शिक्षण फक्त चौथी पर्यंत झालेले आहे. वाशिम नगरपरिषदेमध्ये त्यांनी १९ वर्ष सफाई कामगार म्हणून नोकरी केलेली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य करत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९० साली त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना काँग्रेसचा हा गड ताब्यात घेतला.

मात्र २०१९ साठी आता भाजप आणि मतदारसंघातील मतदारांकडून नव्या चेहऱ्याची मागणी होत आहे. मतदारसंघाला सुशिक्षित आमदार मिळावा, अशी तरुणांची भावना झालेली आहे.

Lakhan Sahdev Malik
आमदार लखन सहदेव मलिक

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) लखन सहदेव मलिक, भाजप – ४८,१९६
२) शशिकांत पेंढारकर, शिवसेना – ४३,८०३
३) सुरेश इंगळे, काँग्रेस – ३५,९६८
४) डॉ. दिपक ढोके, राष्ट्रवादी – २१,६९०
५) मिलिंद पखाले, भारिप – १३,२७६


 

हे वाचा – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ