घरमहा @२८८वरळी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १८२

वरळी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८२

Subscribe

वरळी (विधानसभा क्र. १८२) हा मुंबई शहरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या इमारतींचं बांधकाम या भागामध्ये मोठ्या संख्येनं होत आहे. मुंबईतल्या वेगाने विकसित होणाऱ्या ठिकाणांमध्ये वरळीचा समावेश होतो. मराठी भाषिकांचं प्राबल्य आणि जुन्या मुंबईचे रहिवासी असलेले मतदार यामुळे या मतदारसंघाने बाजूच्याच माहीमप्रमाणेच शिवसेनेला साथ दिली आहे. इथेही २००९ची निवडणूक सोडली तर १९९०पासूनच्या ६ निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार इथे निवडून आला आहे. या मतदारसंघात एकूण २४७ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १८२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४९,०६७
महिला – १,१६,०२४

- Advertisement -

एकूण मतदार – २,६५,०९१


sunil shinde
सुनील शिंदे

विद्यमान आमदार – सुनील शिंदे, शिवसेना

१९८५ साली शिवसेनेचे शाखा उपप्रमुख म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या सुनील शिंदे यांनी २००७मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला. २०१४मध्ये ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. नुकतेच याच मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सुनील शिंदेंची उमेदवारी कापली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुनील शिंदे, शिवसेना – ६०,६२५
२) सचिन अहिर, राष्ट्रवादी – ३७,६१३
३) सुनील राणे, भाजप – ३०,८४९
४) विजय कुडतरकर, मनसे – ८४२३
५) दत्तात्रय नवघणे, काँग्रेस – ५९४१

नोटा – १५५९

मतदानाची टक्केवारी – ५५.९३ %


हेही वाचा – मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -