घरमहा @२८८यवतमाळ विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ७८

यवतमाळ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७८

Subscribe

यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ (विधानसभा क्र. ७८) विधानसभा मतदारसंघ आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. यवतमाळ विभानसभा मतदारसंघ हा विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांच्यासाठी ओळखला जातो. अपक्ष निवडणूक लढवून धोटे यांनी या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. त्यानंतर मात्र काँग्रेसचा उमेदवार इथे निवडून येत होता. १९९५ आणि २००४ साली भाजपने हा मतदारसंघ ताब्यात घेतला होता. २००९ साली पुन्हा एकदा काँग्रेसच्या नीलेश पारवेकर यांनी भाजपकडून मतदारसंघ खेचून घेतला.

मात्र २०१४ साली पुन्हा एकदा मदन येरावार यांच्यामार्फत भाजपने यवतमाळ मतदारसंघ काबीज केला. यवतमाळमध्ये आरोग्य, उद्योग, चांगले रस्ते यांची वाणवा आहे. काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचे पूत्र राहुल यांनी काँग्रेसकडून या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून यावेळी ते पुन्हा एकदा निवडणूक लढवतील. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच प्रमुख लढत असेल.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ७८

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,७८,३२७
महिला – १,६९,२२९

एकूण मतदान – ३,४७,५५८

विद्यमान आमदार – मदन येरावार, भाजप

मदन येरावार हे फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत. यवतमाळ नगरपरिषदेचे नगरसेवक ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असा येरावार यांच्या राजकारणाचा प्रवास आहे.

२०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे मदन येरावार यांचा विजय सोपा झाला. अवघ्या १२२७ मतांनी मदन येरावार विजयी झाले होते. २०१४ साली बसपाकडून निवडणूक लढवलेले तारिक लोखंडवाला तिसऱ्या स्थानावर होते. यावेळी ते राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छूक आहेत. तर राष्ट्रवादीचे यवतमाळमधील नेते माजी आमदार संदीप बाजोरिया सुद्धा २०१९ साठी तयारी करत आहेत.

78 - Madan yerawar
यवतमाळचे आमदार मदन येरावार

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) मदन येरावार, भाजप – ५३,६७१
२) संतोष ढवळे, शिवसेना – ५२,४४४
३) मो. तारिक लोखंडवाला, बसपा – ३४,४९८
४) राहुल ठाकरे, काँग्रेस – ३३,१५२
५) संदिप बाजोरिया, राष्ट्रवादी – १७,९०९


हे वाचा – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -