येवला विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११९

नाशिक जिल्ह्यातील येवला (विधानसभा क्र. ११९) विधानसभा मतदारसंघ आहे.

Nashik

नाशिक जिल्ह्यातील येवला हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. पैठणी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात विणकरी, माळी, वंजारी आणि मराठा आदी समाजाचे प्राबल्य दिसून येते. कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव, पाटोदा आणि येवला हे महत्वाची शहरे यामध्ये येतात.

नाशिक जिल्ह्यातील सर्वात पूर्वेचा तालुका असूनसुद्धा नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने मध्यवर्ती भाग समजला जातो. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास जरी मुंबई मधून सुरू झालेला असला तरी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्यानंतर येवला मतदारसंघातून ते राजकीय स्थिर झाले आहेत.

मतदारसंघ क्रमांक : ११९

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या

पुरुष : १,५५,४४६
महिला : १,३९,६३३
तृतीयपंथी : ६
एकूण मतदान २,९५,०८५

विद्यमान आमदार : छगन भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून नगरसेवक झालेल्या भुजबळांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. पुढे जाऊन मुंबई महापालिकेत महापौरपद देखील भूषविले. कालांतराने शिवसेनेसोबत झालेल्या मतभेदांमुळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांना साथ देत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. २००४ मध्ये झालेल्या विधासभेच्या निवडणुकांमध्ये येवला मतदारसंघातून उमेदवारी करत विजय मिळविला आणि पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. राष्ट्रवादीतील ओबीसी नेते म्हणून देखील त्यांची ओळख तयार झाली.
राष्ट्रवादी पक्षातर्फे सत्तेत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आदी पदे भूषवत सलग १० वर्षे त्यांनी नाशिकचे पालकमंत्री म्हणून देखील पद भूषवले होते.

Chhagan Bhujbal
येवला विधानसभा मतदारसंघ आमदार छगन भुजबळ

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

छगन भुजबळ – राष्ट्रवादी कॉंग्रेस – १,१२,७८७
संभाजी पवार – शिवसेना – ६६,३४५


हे ही वाचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ