६ – अकोला लोकसभा मतदारसंघ

Maharashtra
6 - Akola Lok Sabha Constituency
अकोला लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

अकोला हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अकोला जिल्ह्यामधील ५ आणि वाशिम जिल्ह्यामधील एक असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अकोला हे आहे.अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो. १ जुलै, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला आणि वाशिम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले. जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, अकोट व तेल्हारा हे तालुके आहेत. अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१ चौ.कि.मी असून लोकसंख्या १६,३०,२३९ इतकी आहे.

मतदारसंघाचा क्रमांक – ६

नाव – अकोला

संबंधित जिल्हे – अकोला आणि वाशिम

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

प्रमुख शेती पीक – कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग, उडीद, सोयाबीन, गहू, हरभरा, जवस, करडई

शिक्षणाचा दर्जा – ८१.४१ टक्के


मतदारसंघ राखीव – खुला

एकूण मतदार – ९ लाख ७७ हजार ५८९

महिला – ४ लाख ३३ हजार ६३३

पुरुष – ५ लाख ४३ हजार ९५६


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

संजय धोत्रे – भाजप – ५ लाख ५४ हजार ४४४

प्रकाश आंबेडकर -वंचित बहुजन आघाडी – २ लाख ७८ हजार ४४८

हिदायत पटेल – काँग्रेस – २ लाख ५४ हजार ३७०

नोटा – ८ हजार ८६६


अकोला विधानसभा मतदारसंघ

अकोला जिल्हा

२८ अकोट – प्रकाश भारसाखळे, भाजप

२९ बाळापूर – बळीराम सिरस्कार, भारिप

३० अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा, भाजप

३१अकोला पूर्व – रणधीर सावरकर, भाजप

३२ मुर्तिजापूर (SC) – हरीश पिंपळे, भाजप

वाशिम जिल्हा

३३ रिसोड – अमित झनक, काँग्रेस


sanjay dhotre
संजय धोत्रे, भाजप

विद्यमान खासदार – संजय धोत्रे, भाजप

अकोला लोकसभा मतदारसंघा राज्यातील एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे. २०१४ च्या मोदी लाटेत खासदार संजय धोत्रे यांनी तब्बल २ लाखांवर मतांनी विजय मिळवला होता. तर प्रकाश आंबेडकर या निवडणुकीत थेय तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. खासदार संजय धोत्रे चौथ्यांदा येथून लढण्यासाठी सज्ज आहेत. जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील असे दोन गट आहेत. येथून यावेळी संजय धोत्रे यांना तिकिटासाठी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आणि अकोळ्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

२०१४ मधील मतांची आकडेवारी

संजय धोत्रे, भाजप – ४ लाख ५५ हजार ९९६

हिदायत पटेल, काँग्रेस – २ लाख ५३ हजार ०५५

प्रकाश आंबेडकर, भारिप – २ लाख ३८ हजार ६६९

नोट – ६ हजार २००

मतदानाची टक्केवारी – ५८.५० टक्के

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here