१९ – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ

१९ – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची माहिती

Mumbai
19 - Aurangabad loksabha constituency
१९ – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा मानला जातो. अजिंठा लेणी आणि वेरुळ लेणी या दोन जगप्रसिध्द हरिटेज वास्तू भारतातील औरंगाबादमध्ये आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादमधील पैठण शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिध्द आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १०,११०  चौरस किमी आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेली अनेक पर्यटन स्थळ आहेत.  मराठवाडा विभागात दुष्काळ असतो मात्र औरंगाबदमध्ये शेती व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. औरंगाबादमध्ये गोदावरी, तापी आणि पूर्णा या तीन प्रमुख नद्या वाहतात. त्यामुळे या भागामध्ये दुष्काळ परिस्थिती कमी आहे. औरंगाबाद मतदार संघात कन्नड, औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद (पश्चिम), औरंगाबाद (पूर्व), गंगापूर, वैजापूर हे सहा विधानसभा मतदार संघ येतात.

औरंगाबाद जिल्ह्याचे राजकीय परिस्थिती पाहता हा मतदारसंघ शिवसेनाचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे गेल्या ४ वर्षापासून लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. तसंच ते या भागामध्ये २ वेळा आमदार झाले आहेत. या मतदारसंघात यावेळी अनेक राजकीय बदल झाले आहेत. गेल्या ४ निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे आघाडीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ मागितला आहे. आता या निवडणुकीत आघाडीकडून कोणत्या पक्षाला ही जागा दिली जाईल आणि कोणता उमेदवार उभे करणार हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच. पण आता शिवसेना-भाजपमध्ये युती झाल्यामुळे यंदाची निवडणूक शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेचं लढवलीत यात शंका नाही.

मतदारसंघ क्रमांक – १९

नाव – औरंगाबाद

संबंधित जिल्हे – औरंगाबाद

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती आणि उद्योग

प्रमुख शेतीपीक – कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू

शिक्षणाचा दर्जा – ६१.१५ टक्के

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार –  ७ लाख ८५ हजार६६३

महिला-पुरुष मतदार –

पुरुष – ४ लाख २९ हजार ९४४

महिला – ३ लाख ५५ हजार ७१९


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

इम्तियाज जलील – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन -३ लाख ८९ हजार ०४२

चंद्रकांत खैरे – शिवसेना – ३ लाख ८४ हजार ५५०

हर्षवर्धनदादा जाधव – अपक्ष -२ लाख ८३ हजार ७९८

सुभाष मानचंद जाम्बद -काँग्रेस- ९१ हजार ७८९


औरंगाबाद विधानसभा मतदारसंघ

१०५ – कन्नड – हर्षवर्धन जाधव , शिवसेना

१०७ – औरंगाबाद (मध्य) – इम्तियाज जलील, एमआयएम

१०८ – औरंगाबाद पश्चिम – (अनुसुचित जाती) – संजय शिरसाट, शिवसेना

१०९ – औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, भाजप

१११ – गंगापूर – प्रशांत बंब, भाजप

११२ – वैजापूर – भाऊसाहेब चिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस


Shivsena MP chandrakant khaire
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे

विद्यमान खासदार – चंद्रकांत खैरे, शिवसेना

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे गेल्या ३२ वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. औरंगाबादमधून ते दोन वेळा आमदार, चार वेळा खासदार म्हणून निवडून आले. आता पाचव्यांदा ते या मतदारसंघात लोकसभा निवडणुकिला उभे राहणार असून यामध्ये बाजी मारतील की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  औरंगाबादच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. १९८८ साली औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९० मध्ये चंद्रकात खैरे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदारकी जिंकले आणि विधासभेतत पोहचले. १९९५ साली देखील दुसऱ्यांदा निवडून आले. १९९५ ते १९९९ या काळामध्ये त्यांनी गृहनिर्माण, परिवहन आणि पर्यावरण मंत्रालयाचा कारभार संभाळला. त्याच्यांकडे औरंगाबादचे पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी होती. त्यानंतर २००९ ते २०१२ या काळात त्यांनी बीड, लातूर , उस्मानाबादचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. चंद्रकांत खैरे १३, १४, १५ आणि १६ व्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. चंद्रकांत खैरे यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मादी आमदार नितीन पाटील यांचा पराभव केला होता. आता १७ व्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

चंद्रकांत खैरे – शिवसेना – ५ लाख २० हजार ९०२

सुरेश पाटील, काँग्रेस – ३ लाख ५८ हजार ९०२

सुभाष लोमटे – आप, ११ हजार ९७४

नोटा – ६ हजार ३७२

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here