घरमहा @४८३५ - बारामती लोकसभा मतदारसंघ

३५ – बारामती लोकसभा मतदारसंघ

Subscribe
  1. बारामती लोकसभा मतदारसंघ माहीत नाही, असा मतदार महाराष्ट्रात सापडणार नाही. पंतप्रधान, राष्ट्रपती कुठलाही असो, बारामतीमध्ये त्यांची भेट ठरलेली असतेच. भाजपचे ज्येष्ठ नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जेव्हा बारामतीला भेट दिली, तेव्हा ते म्हणाले होते की देशात एक नाही तर १०० बारामती झाल्या पाहीजेत. यावरुनच बारामतीच्या विकासाची झलक पाहायला मिळते. या मतदारसंघात काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी वगळता फक्त एकदाच म्हणजे १९७७ साली जनता पक्षाचा खासदार निवडून आलेला आहे. बाकी सर्वकाळ काँग्रेस विचारांच्या लोकांनीच इथे प्रतिनिधीत्व केलेले आहे. १९८४ साली शरद पवार पहिल्यांदा इथून खासदार झाले होते. त्यानंतर १९९६ ते २००४-०९ पर्यंत सलग शरद पवारच इथे खासदार होते.

शरद पवार यांच्यामुळे या मतदारसंघाची ख्याती संबंध देशभर पसरलेली आहे. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांना महादेव जानकर यांनी चांगलीच टक्कर दिली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे २००९ मधील मताधिक्य मोठ्या प्रमाणात खाली आले होते. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना वगळता इतर अनेक संस्था, नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत.

या मतदारसंघात एमआयडीसीमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. विमान चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी विमानतळ देखील आहे. विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जाते.

- Advertisement -

 

मतदारसंघ क्रमांक – ३५

- Advertisement -

नाव – बारामती

संबंधित जिल्हा – पुणे

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, उद्योग

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या (२०१४) – १८ लाख
१० हजार ००६

पुरुष – ९ लाख ५७ हजार ७६९

महिला – ८ लाख ५२ हजार २३२


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी – ६ लाख ८६ हजार ७१४

कांचन राहुल कुल – भाजप – ५ लाख ३० हजार ९४०

नवनाथ पडळकर – वंचित बहुजन आघाडी – ४४ हजार १३४

नोटा – ७ हजार ८६८

अॅड. मंगेश निलकंठ वंशिव – बहुजन समाज पार्टी – ६ हजार ८८२


पुणे मधील विधानसभा मतदारसंघ

१९९ दौंड – राहुल कुल, रासप

२०० इंदापूर – दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी

२०१ बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी

२०२ पुरंदर – विजय शिवतारे, शिवसेना

२०३ भोर – संग्राम थोपटे, काँग्रेस

२११ खडकवासला – भीमराव तपकीर, भाजप


supriya sule with sharad pawar and ajit pawar

विद्यमान खासदार – सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी

सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. त्यांचे प्राथमिक मुंबईत झाले असून त्यांनी जय हिंद कॉलेजमधून विज्ञान शाखेत पदवी घेतली आहे. तर पुढे कॅलिफोर्नियामधून जल प्रदूषण या विषयाचा अभ्यास केला. सुप्रिया सुळे या २००५ साली राजकारणात आल्या. २००६ मध्ये त्यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यानंतर २००९ साली सुळे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंसाठी बारामती मतदारसंघ सोडला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा म्हणून सुळे यांनी सामाजिक क्षेत्रातही भरीव काम केलेले आहे. महिला सक्षमीकरणाच्या विषयात त्यांनी बरेच काम केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा उत्तराधिकारी कोण? यावर अनेकजन सुप्रिया सुळे यांचे नाव घेतात. सुप्रिया सुळेंनी मात्र अजित पवार आणि त्यांच्यातील संबंध कधीच बिघडू दिलेले नाहीत.


 

२०१४ मधील मतांची आकडेवारी

सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी – ५ लाख २१ हजार ५६२

महादेव जानकर, रासप – ४ लाख ५१ हजार ८४३

सुरेश खोपडे, आप – २६ हजार ३३०

काळुराम चौधरी, बसपा – २४ हजार ८८४

नोटा – १४ हजार १९५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -