घरमहा @४८३९ - बीड लोकसभा मतदारसंघ

३९ – बीड लोकसभा मतदारसंघ

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला आणि नेहमीच राजकीय हेवेदाव्यांनी चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बीड. कायम दुष्काळी अशी ओळख असलेला हा जिल्हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेत आला. बीडमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतीवर गुजराण असणाऱ्या लोकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील लाखो लोक ऊस तोडणीवर अवलंबून आहेत. तर काही रोजगारासाठी स्थलांतरीत झाले आहेत.

सुरुवातील काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात मुंडेनी भाजपचा झेंडा रोवला. बीड जिल्हा पुर्वीच्या हैद्राबाद संस्थानात होता. द्विभाषिक राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठवाड्यात आला. बीड जिल्ह्यात एकून ११ तालुके असून ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. स्व. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर या बीडमध्ये तीनवेळा खासदार राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा अजूनही बीडमध्ये राजकीय दबदबा आहे. दिवंगत नेत्या केशरबाई यांनी बीडमध्ये शैक्षणिक आणि सहकारी संस्थाचे जाळे विणले होते.

- Advertisement -

बीडमध्ये ओबीसी आणि मराठा या दोन्ही जातींचे प्राबल्य आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा नेहमीच संघर्ष होत राहिला आहे. सध्या राष्ट्रवादीचा एक तर इतर पाच भाजपचे आमदार आहेत. कधीकाळी इथे सर्वाधिक राष्ट्रवादीचे आमदार होते. सध्या धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष बीड जिल्हा पाहत आहे.


 

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ३९

नाव – बीड

संबंधित जिल्हा – बीड

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या (२०१४) – १७ लाख ८७ हजार २०७

पुरुष – ९ लाख ५९ हजार ६७१

महिला – ८ लाख २७ हजार ५३६


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

डॉ. प्रीतम मुंडे – भाजप – ६ लाख ७८हजार १७५

बजरंग मनोहर सोनवणे – राष्ट्रवादी काँग्रेस – ५लाख ९ हजार ८०७

प्रो. विष्णू जाधव – वंचित बहुजन आघाडी – ९२ हजार १३९

संपत चव्हाण -अपक्ष – १६ हजार ७९२


बीड मधील विधानसभा मतदारसंघ

२२८ गेवराई – लक्ष्मण पवार, भाजप

२२९ माजलगाव – आर. टी. देशमुख, भाजप

२३० बीड – जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादी

२३१ आष्टी – भीमराव धोंडे, भाजप

२३२ केज (SC) – संगीता ठोंबरे, भाजप

२३३ परळी – पंकजा मुंडे, भाजप


pritam munde mp of beed
खासदार डॉ. प्रीतम मुंडे

विद्यमान खासदार – डॉ. प्रीतम लोखंडे, भाजप

एम.डी असेल्या प्रितम मुंडे या व्यवसायाने डॉक्टर असून त्वचारोगतज्ञ (Dermatologist) आहेत. लोकसभेतील कमी वयाच्या खासदारांमध्ये प्रीतम मुंडे यांचा समावेश होतो. राजकारणाशी कोणताही थेट संबंध नसतानाही मुंडे यांच्या निधनामुळे त्यांना राजकारणात यावे लागले.
२०१४ च्या निवडणुकीत स्व. गोपीनाथ मुंडे बीडमध्ये १ लाख ३६ हजार इतक्या मताधिक्याने निवडून आले होते. केंद्रीय ग्रामविकास खात्याची त्यांनी शपथही घेतली होती. मात्र त्यांनतंर त्यांचे अपघाती निधन झाले. मुंडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर त्यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळाली. पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांना भरभरून मते मिळाली. देशात सर्वाधिक मतदान घेऊन विजयी झालेल्यापैकी त्या एक आहेत. नगर-परळी-बीड रेल्वे मार्गाच्या प्रश्नासाठी त्यांनी निधी आणल्यामुळे त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण आहे.


 

२०१४ मधील मतांची आकडेवारी

डॉ. प्रीतम मुंडे, शिवसेना – ९ लाख १६ हजार ९२३

अशोक पाटील, काँग्रेस – २ लाख २४ हजार ६७८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -