घरमहा @४८५ - बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

५ – बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

Subscribe

बुलढाणा या मतदारसंघामध्ये सध्या बुलढाणा जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा (मध्य प्रदेश) आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणार्‍या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. खामगांव, चिखली, जळगाव जामोद, देउळगांव राजा, नांदुरा, बुलढाणा तालुका, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगांव, संग्रामपूर आणि सिंदखेड राजा हे या जिल्ह्यातील तालुके आहेत.

मतदारसंघाचा क्रमांक – ५

- Advertisement -

नाव – बुलढाणा

संबंधित जिल्हा – बुलढाणा

- Advertisement -

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, औद्योगिक कारखाने

प्रमुख शेती पीक – कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल

शिक्षणाचा दर्जा – ८५ टक्के


मतदारसंघ राखीव – खुला

एकूण मतदार – ९ लाख ७८ हजार ३९२

महिला – ४ लाख ४२ हजार ५६५

पुरुष – ५ लाख ३५ हजार ८२७


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

प्रतापराव जाधव – शिवसेना – ५ लाख २१ हजार ९७७

राजेंद्र शिंगणे – राष्ट्रवादी काँग्रेस – ३ लाख ८८ हजार ६९०

बळीराम भगवान -वंचित बहुजन आघाडी – १ लाख ७२ हजार ६२७

नोटा – ७ हजार ६८१


बुलढाणा विधानसभा मतदारसंघ

बुलढाणा जिल्हा

२२ बुलढाणा – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस

२३ चिखली – राहुल बोंद्रे, काँग्रेस

२४ सिंदखेडराजा – डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना

२५ मेहकर (SC) – डॉ. संजय रायमूलकर, शिवसेना

२६ खामगाव – आकाश फुंडकर, भाजप

२७ जळगाव (जामोद) – डॉ. संजय कुंटे, भाजप


shivsena-mp-says-farmers-are-getting-less-compensation-of-land_730X365
प्रतापराव जाधव, शिवसेना

विद्यमान खासदार – प्रतापराव जाधव, शिवसेना

बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. २०१४ ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णराव इंगळे यांचा २ लाख मतांनी पराभवल केला. बुलढाणा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेने पाच वेळा प्रतिनिधित्व केले आहे. भाजप सोबत शिवसेनेने युती केली नसती तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीने अलगद जिंकला असता. एवढी शिवसेनेची पकड या मतदारसंघात ढिल्ली झाली आहे. प्रतापराव जाधव या शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर येथील लोक नाराज आहेत. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ जिंकण्याचा चंग बांधून कामाला सुरुवात केली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हि या मतदासंघातून निवडणूक लढून जिंकण्याचा दावा करत आहे.एकंदर या मतदारसंघात शिवसेनेसाठी लढाई सोपी नाही. परंतु भाजप सोबत युती झाल्याने त्यांना बळ मात्र निश्चित मिळाले आहे.

२०१४ मधील मतांची आकडेवारी

प्रतापराव जाधव, शिवसेना – ५ लाख ०८ हजार ९७२

कृष्णराव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस – ३ लाख ४९ हजार ५३४

हाफिझ अब्दुल, बसपा – ३३ हजार ७७७

नोट – १० हजार ५४६

मतदानाची टक्केवारी – ६१.३४ टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -