१३ – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

१३ - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ माहिती

Mumbai
13 - Chandrapur loksabha constituency
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ नकाशा

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघापैकी एक महत्वाचा मतदारसंघ आहे. हा जिल्हा विदर्भात येतो. या मतदारसंघामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ४ आणि यवतमाळ जिल्ह्यातील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. चंद्रपूर जिल्हा आधी चांदा नावाने ओळखला जायचा. ब्रिटिशांच्या काळात या जिल्ह्याला चांदा नावाने संबोधले जायचे त्यानंतर १९६४ मध्ये या जिल्ह्याचे नाव चंद्रपूर झाले. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हटले जाते. कारण या जिल्ह्यात अनेक कोळश्याच्या खाणी आहेत. तसंच चंद्रपूर जिल्ह्यात कोळश्यानंतर चुन्याच्या खाणी देखील आहेत. या जिल्ह्याची लोकसंख्या २० लाख ७१ हजार १०१ इतकी आहे तर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १० हजार ४९० चौरस किमी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके येतात. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी तसंच महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती आणि सिमेंट उद्योग आहेत. त्याप्रमाणे सर्वात प्रसिध्द म्हणजे बाबा आमेट यांचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यामध्ये येते. तसंच प्रसिध्द ताडोबा व्याघ्रप्रकल्प याच जिल्ह्यात येते.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता या जिल्ह्यामध्ये ६ वेळा भाजपचेच खासदार निवडून आले आहेत. खासदार हसंराज अहीर हे या मतदारसंघातून ४ वेळा खासदार झाले आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील ५ विधानसभा मतदार संघात भाजपची सत्ता आहे. तर एका विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सत्ता आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाल्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडेच असणार आहे. चंद्रपूरमधून ते ४ वेळा निवडणून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात हसंराज अहिर यांच्याच नावाची सध्या चर्चा सुरु आहे.

मतदारसंघ क्रमांक – १३

नाव – चंद्रपूर

संबंधित जिल्हे – चंद्रपूर आणि यवतमाळ

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, उद्योग

प्रमुख शेतीपीक – तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर

शिक्षणाचा दर्जा – ५९.४ टक्के

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार – ११ लाख ८ हजार ७४९

महिला-पुरुष मतदार –

पुरुष – ६ लाख २ हजार २६९

महिला – ५ लाख ६ हजार ४८०


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

सुरेश धानोरकर – काँग्रेस -५ लाख ५९ हजार ५०७

हसंराज अहिर – भाजप- ५ लाख १४ हजार ७४४

अॅड. राजेंद्र महाडोळे -वंचित बहुजन आघाडी – १ लाख १२ हजार ०७९

सुशील वासनिक – बहुजन समाज पार्टी -११ हजार ८१०


चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ

७० – राजुरा- संजय धोटे, भाजप

७१ – चंद्रपूर (अनुसुचित जाती) – नानाजी शामकुळे, भाजप

७२ – बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजप

७५ – वरोरा – सुरेश धानोरकर, शिवसेना

यवतमाळ विधानसभा मतदारसंघ

७६– वणी – संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप

८० – अर्णी – राजू तोडसम, भाजप


bjp mp hansraj ahir
भाजप खासदार हंसराज अहिर

विद्यमान खासदार – हसंराज अहिर, भाजप

चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे हसंराज अहिर हे खासदार आहेत. हंसराज अहिर भाजपची स्थापना झाल्यानंतर १९८० साली भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष होते. या पदावर असताना युवकांचे संघटना, राजकारण असताना सामाजिक कार्य करण्यात त्यांनी रुची होती. १९८४ साली भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष झाले ते १९८८ पर्यंत याच पदावर कायम राहिले. १९८६ मध्ये ते प्रदेश कार्यकारणीचे सदस्य बनले. त्यानंतर १९९० ला ते भाजपचे जिल्हाअध्यक्ष बनले. १९९४ पर्यंत ते याच पदावर होते. १९९४ ला विधासभा निवडणूक लढवली आणि विधापरिषदेचे सदस्य बनले. १९९६ ला चंद्रपूर लोकसभा निवडणूकीला उभे राहून ते खासदार झाले. संसदेत असताना रेल्वे, टेलिफोन, सिंचन योजनांवर त्यांनी काम केले.

१९९८ साली महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडाचे नागपूर विभागाच्या सभापती पदी नियुक्ती झाली. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचाया २,८०० मतांनी पराभव झाला. २००३मध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस झाले. २००४ साली चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ५९,८२३ मतांनी ते विजयी झाले. २००९ साली चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून ते तिसऱ्यांना विजयी झाले. चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाऊंडेशनकडून देण्यात येणआऱ्या संसद रत्न पुरस्कार त्यांना सलग ५ वेळा प्रदान करण्यात आला. देशातला सर्वात मोठा कोळसा घोटाळा त्यांनी जनतेसमोर आणला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा ते चौथ्यांदा विजयी झाले. ११ जुलै २०१६ मध्ये त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री पदाची शपथ घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीतही हसंराज अहिर यांच्याच नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

हसंराज अहिर – भाजप, ५ लाख ७ हजार ५०३

संजय देवतळे – काँग्रेस, २ लाख ७१ हजार ६१७

वामनराव चपट – आप, २ लाख ४ हजार १९२

नोटा – ८ हजार २५२