घरमहा @४८१२ - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ

१२ – गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ

Subscribe

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१४ चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो. राज्याच्या एका कोपऱ्यावर वसलेल्या नक्षलवादग्रस्त गडचिरोली लोकसभा मतदारसंघात गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली, आरमोरी, ब्रह्मपुरी, चिमूर व आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात ईशान्येला असून आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमा त्याला लागून आहेत. हा जिल्हा नक्सल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्सल समर्थित लोक आश्रय घेतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून तिच्या दक्षिणेला हा जिल्हा वसलेला आहे. प्राणहिता (वैनगंगा व वर्धा या नद्यांच्या संगमाने बनलेली नदी) व इंद्रावती ह्या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात. जिल्ह्यातील आदिवासीची विशिष्ट अशी संस्कृती आहे.

मतदारसंघाचा क्रमांक – १२

- Advertisement -

नाव – गडचिरोली-चिमूर

संबंधित जिल्हे – गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर

- Advertisement -

प्रमुख उद्योग-व्यवसाय – बांबूची झाडे व तेंदूपान

प्रमुख शेती पीक – भात

शिक्षणाचा दर्जा – ७०.०६ टक्के


मतदारसंघ राखीव – (ST)

एकूण मतदार – १० लाख २७ हजार ६५४

महिला – ४ लाख ८९ हजार ९८०

पुरुष – ५ लाख ३७ हजार ६७४


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

अशोक नेते – भाजप – ५ लाख १९ हजार ९६८

डॉ. नामदेव दल्लूजी उसेंडी – काँग्रेस – ४ लाख ४२ हजार ४४२

डॉ. रामेशकुमार बाबुरावजी गजबे – वंचित बहुजन आघाडी – १ लाख ११ हजार ४६८

हरिचंद्र नागोजी मंगम – बहुजन समाज पार्टी – २८ हजार १०४

नोटा – २४ हजार ५९९


गडचिरोली-चिमूर विधानसभा मतदारसंघ

गोंदिया जिल्हा

६६ आमगाव (ST) – संजय पुरम, भाजप

गडचिरोली जिल्हा

६७ आरमोरी (ST) – दामजी कृष्णा, भाजप

६८ गडचिरोली (ST) – डॉ. मादगुजी देवराव, भाजप

६९ अहेरी (ST) – सत्यवानराव अमरिषराव राजे, भाजप

चंद्रपूर जिल्हा

७३ ब्रम्हपुरी – विजय वडेट्टीवार, काँग्रेस

७४ चिमूर – भांगडीया बंटी, भाजप


ashok_nete_mp_gadchiroli
अशोक नेते, भाजप

विद्यमान खासदार – अशोक नेते, भाजप

दांडगा जनसंपर्क, भेटणाऱ्यांची सदैव गर्दी आणि उजळ प्रतिमा या बळावर भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघावर पकड ठेवून असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी आरक्षण, ग्रामसभांचा जनआक्रोश, सूरजागड लोहखाण व मेडीगट्टा-कालेश्वर प्रकल्पावरून जनतेत निर्माण झालेली नाराजी, बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न, माना समाजाची ओढवून घेतलेली नाराजी, पालकमंत्र्यांच्या विरोधात स्थानिकांचा रोष आणि भाजपतील अंतर्गत गटबाजी यामुळे हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. तर अंतर्गत गटबाजीमुळे संघटनात्मक पातळीवर पूर्णत: पोखरलेल्या काँग्रेस समोर भाजपकडून हा मतदारसंघ परत मिळविण्याचे आव्हान आहे.

२०१४ मधील मतांची आकडेवारी

अशोक नेते, भाजप – ५ लाख ३५ हजार ६१६

डॉ. नामदेव उसेंडी – २ लाख ९८ हजार ९७६

रामराव नन्नावरे, बसपा – ६६ हजार ८७७

नोट – २४ हजार ४७९

मतदानाची टक्केवारी – ६९.९५ टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -