४८ – हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची माहिती

Mumbai
48 - Hatkanangale loksabha constituency
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

हातकणंगले मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. कारण हा संपूर्ण भाग साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. हातकणंगले हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हातकणंगले मतदारसंघाचे एकूण क्षेत्रफळ १६.७२ चौरस किमी आहे. या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ असे ४ आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिरोळा असे दोन असे एकूण मिळून ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. हातकणंगले मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर हातकणंगले मतदारसंघाच्या अगोदर येथे इचलकरंजी मतदारसंघ होता. २००९ साली हातकणंगले मतदारसंघ अस्तित्वात आला.

मतदारसंघ क्रमांक – ४८

नाव – हातकणंगले

संबंधित जिल्हे – कोल्हापूर, सांगली

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

प्रमुख शेतीपीक – ऊस

शिक्षणाचा दर्जा – 

पुरुष – ८१.५२%

महिला – ७०.३८%

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार – ११ लाख ८६ हजार ७२७

महिला-पुरुष मतदार –

पुरुष – ७ लाख ३० हजार ४७०

महिला – ५ लाख ५६ हजार २४९

इतर – ८


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

धैर्यशील संभाजीराव माने – शिवसेना – ५ लाख ८५ हजार ७७६

राजू आण्णा शेट्टी – स्वाभिमान पक्ष – ४ लाख ८९ हजार ७३७

असलम बादशाहजी सैय्यद – वंचित बहुजन आघाडी – १ लाख २३ हजार ४१९

संग्रामसिन्ह जयसिंगराव गायकवाड – अपक्ष – ८ हजार ६९५

राजू मुजिकराव शेट्टी – बहुजन महा पार्टी – ८ हजार १०३


हातकणंगले विधानसभा मतदारसंघ 

२७७ – शाहूवाडी – सत्यजीत पाटील, शिवसेना

२७८ – हातकणंगले (अनुसुचित जाती) – सुजित मिंचेकर, शिवसेना

२७९ – इचलकरंजी – सुरेश हलवणकर, भाजप

२८० – शिरोळ – उल्हास पाटील, शिवसेना

२८३ – इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी

२८४ – शिरोळा – शिवाजीराव नाईक, भाजप


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार – राजू शेट्टी

विद्यमान खासदार – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आहे. राजू शेट्टी हातकणंगले मतदार संघातून दोन वेळा खासदार झाले. १५ व्या आणि १६ व्या लोकसभा निवडणुकीतून ते खासदार म्हणून निवड आले. कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये शेती व्यवसाय केला जातो. या भागात प्रामुख्याने ऊसाची शेती केली जाते. खासदार राजू शेट्टी यांनी वारंवार ऊस आणि दूधाला चांगली किंमत मिळावी यासाठी लढा दिला. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे शेतकरी त्यांच्यासोबत आहे. २००९ साली राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांचा पराभव करत खासदार झाले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत देखील ते विजयी झाले.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटना – ६ लाख ३९ हजार १९१

कल्लाप्पा आवाडे – राष्ट्रवादी काँग्रेस – ४ लाख ६१ हजार ८३५

सुरेशदादा पाटील – अपक्ष – २५ हजार ६२५

चंद्रकांत कांबळे – बहुजन समाजवादी पार्टी – ११ हजार ४८१

नोटा – १० हजार ३५

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here