घरमहा @४८१५ - हिंगोली लोकसभा मतदारसंघ

१५ – हिंगोली लोकसभा मतदारसंघ

Subscribe

१५ - हिंगोली लोकसभा मतदारसंघाची माहिती

हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागात येतो. हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. मात्र १ मे रोजी औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी आणि सेनगांव हे तालुके असलेला हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला. हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ चौरस किमी आहे. हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ९,८७,१६० ऐवढी आहे. या जिल्ह्यामध्ये प्रमुख व्यवसाय शेती असून ज्वारी आणि कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यात येते. मराठवाड्यातल्या या जिल्ह्यातही दुष्काळ परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण देखील जास्त आहे. शिक्षण, बेरोजगारी, पाणी, रस्ते, वीज या समस्या आजही या जिल्ह्यामध्ये आहेत.

हिंगोली मतदार संघात यवतमाळ जिल्ह्यातील उरखेड विधानसभा मतदारसंघ येते. नांदेड जिल्ह्यातला किनवट आणि हदगाव विधानसभा मतदारसंघ येतो. तर हिंगोली जिल्ह्यातील बसमत, कळमनुरी, हिंगोली विधासभा मतदारसंघ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार काँग्रेसचे राजीव सातव आहेत. या मतदार संघातून ५ वेळा काँग्रेसचा खासदार निवडणून आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव करत विजयी झाले होते. यावेळी देखील काँग्रेसकडून राजीव सातव यांचेच नाव पुढे येत असल्याची चर्चा आहे. भाजप-सेनेची युती झाली आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडून प्रकाश पाटील देवसरकर, बी. डी पाटील हे निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. तर जयप्रकाश मुंदडा हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – १५

नाव – हिंगोली

- Advertisement -

संबंधित जिल्हे – यवतमाळ, नांदेड, हिंगोली

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

प्रमुख शेतीपीक – ज्वारी आणि कापूस

शिक्षणाचा दर्जा – ७६.०४ टक्के

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार – १० लाख ४९ हजार ८५

महिला-पुरुष मतदार –

पुरुष – ५ लाख ७५ हजार ६६३

महिला – ४ लाख ७३ हजार ४२०


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल 

हेमंत पाटील – शिवसेना – ५ लाख ८६ हजार ३१२

सुभाष वानखेडे -काँग्रेस – ३ लाख ८ हजार ४५६

मोहन राठोड – वंचित बहुजन आघाडी – १ लाख ७४ हजार ०५१

संदेश चव्हाण – अपक्ष – २३ हजार ६९०


यवतमाळ विधानसभा मतदारसंघ

८२ – उमरखेड (अनुसुचित जाती) – राजेंद्र नजरधने, भाजप

नांदेड विधानसभा मतदारसंघ

८३ – किनवट – प्रदिप जाधव (नाईक), राष्ट्रवादी काँग्रेस

८४ – हदगाव – नागेश पाटील अष्टीकर, शिवसेना

हिंगोली विधानसभा मतदारसंघ

९२ – बसमत – जयप्रकाश मुंदडा, शिवसेना

९३ – कळमनुरी – संतोष टारफे, काँग्रेस

९४ – हिंगोली – तानाजी मुटकुळे, भाजप


congress mp rajiv satav
काँग्रेसचे खासदार राजीव सातव

विद्यमान खासदार – राजीव सातव, काँग्रेस

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव यांनी शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा १ हजार ६३२ मतांनी पराभव करत विजयी मिळवला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेल्या दोन खासदारांपैकी राजीव सातव हे एक आहेत. राजीव सावत यांची अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर ते राहुल गांधी यांच्या विश्वासातील नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. सोळाव्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थिती आणि स्थानिक खासदार विकास निधीचा वापर या कामगिरीबद्दल हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार राजीव सातव यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार देण्यात आला आहे. एक नाही तर दोन वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी देखील आहेत.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

राजीव सातव – काँग्रेस – ४ लाख ६७ हजार ३९७

सुभाष वानखेडे – शिवसेना, ४ लाख ६५ हजार ७६५

डी. एन नाईक – सीपीएम – १४ हजार ९८६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -