३ – जळगाव लोकसभा मतदारसंघ

Maharashtra
3 Jalgaon
जळगाव लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

जळगाव जिल्ह्याला पूर्वी पूर्व खान्देश हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस किमी आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणीदेखील बोलली जाते. प्रसिद्ध कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या. जळगाव जिल्ह्यात. अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव तालुका, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगांव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल आणि रावेर या १५ तालुक्यांचा समावेश होतो.

मतदारसंघाचा क्रमांक – ३

नाव – जळगाव

संबंधित जिल्हा – जळगाव

प्रमुख उद्योग-व्यवसाय – केळीचे पीकं, ज्वारी, कापूस, ऊस, मका, तुळ, गहू, बाजरी. तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग, तीळ ही पिके. ईडलिंबू, कागदी लिंबू, चिकू, टरबूज, द्राक्षे, पपया, बोरे, मेहरूणची बोरे, मोसंबी, सिताफळ इत्यादी फळांचे उत्पादन. कडधान्यांपैकी उडीद, चवळी, तूर, मटकी, मूग, हरभरा इत्यादींची उपज जिल्ह्यात होते.

प्रमुख शेती पीक – केळी, कापसाची

शिक्षणाचा दर्जा – ७९.७३ टक्के


मतदारसंघ राखीव – खुला

एकूण मतदार – ९ लाख ८९ हजार ८२१

महिला – ४ लाख ३९ हजार ३१२

पुरुष – ५ लाख ५० हजार ५०३


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

उमेश भय्यासाहेब पाटील – भाजप – ७ लाख १३ हजार ८७४

गुलाबराव बाबुराव देवकर – राष्ट्रवादी काँग्रेस – ३ लाख २ हजार २५७

अंजलि रत्नाकर बाविस्कर – वंचित बहुजन आघाडी – ३७ हजार ३६६

नोटा – १० हजार ३३२

राहुल नारायण बनसोडे – बहुजन समाज पार्टी -३ हजार ४२८


जळगाव विधानसभा मतदारसंघ

जळगाव जिल्हा

१३ जळगाव शहर – सुरेश भोळे, भाजप

१४ जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, शिवसेना

१५ अमळनेर – शिरीष चौधरी, अपक्ष

१६ एंरडोल – डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

१७ चाळीसगाव – उन्मेष पाटील, भाजप

१८ पाचोरा – किशोर पाटील, शिवसेना


ए. टी. नाना पाटील, भाजप

विद्यमान खासदार – ए. टी. नाना पाटील, भाजप

ए. टी. नाना पाटील ऊर्फ अशोक तापीराम पाटील जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजप खासदार आहे. ते दोन वेळा याच मतदार संघातून निवडून आले आहेत. खासदार पाटील यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात नगरसेवक पदापासून झाली.


२०१४ मधील मतांची आकडेवारी

ए. टी. नाना पाटील, भाजप – ६ लाख ४७ हजार ३८७

डॉ. सतीश नानासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस – २ लाख ६४ हजार १५१

व्ही. टी. बागुल, बसपा – १० हजार ८३५

नोट – ३ हजार २६०

मतदानाची टक्केवारी – ५७.९८ टक्के

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here