घरमहा @४८१८ – जालना लोकसभा मतदारसंघ

१८ – जालना लोकसभा मतदारसंघ

Subscribe

१८ – जालना लोकसभा मतदारसंघाची माहिती

जालना मतदारसंघ जालना आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्हांनी मिळून तयार झाला आहे. या मतदार संघात भाजपचे २, शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. जालना मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. नवव्या लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत या मतदार संघात भाजपचीच सत्ता आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा २ लाख ६ हजार ३३८ मतांनी पराभव केला होता.

जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७ हजार ६१२ चौरस किमी आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या १९ लाख ५९ हजार ०४६ आहे. जालना जिल्‍हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे चालतात. तसंच दाल मिल, बी-बियाण्यांचे उद्योगधंदे जालन्यात आहेत. जालना जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषी-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग जालना जिल्ह्यामध्ये आहेत. जालना जिल्ह्यामध्ये उन्हाळा खूप कडक असतो. या भागामध्ये ज्वारी, गहू , कापूस ही प्रमुख पिके आहेत तसंच मोसंबीचे देखील उत्पन्न घेतले जाते. जालना जिल्ह्यामध्ये ११६ कारखाने आहेत मात्र त्यामधील १४ कारखाने बंद पडले आहेत.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – १८

नाव – जालना

- Advertisement -

संबंधित जिल्हे – जालना, औरंगाबाद

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, उद्योग

प्रमुख शेतीपीक – ज्वारी, गहू , कापूस, इतर धान्य

शिक्षणाचा दर्जा – ७३.६१ टक्के

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार – १० लाख ६५ हजार ५२६

महिला-पुरुष मतदार –

पुरुष – ५ लाख ९५ हजार ९७९

महिला – ४ लाख ६९ हजार ५४७


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

रावसाहेब दानवे – भाजप – ६ लाख ९८ हजार ०१९

विलास औताडे – काँग्रेस – ३ लाख ६५ हजार २०४

शरदचंद्र वानखेडे – वंचित बहुजन आघाडी – ७७ हजार १५८

नोटा – १५ हजार ६३७


जालना विधानसभा मतदारसंघ

१०१ – जालना – अर्जुन खोतकर, शिवसेना

१०२ – बदनापूर (अनुसुचित जाती), नारायण कुचे, भाजप

१०३ – भोकरदन – रावसाहेब दानवे, भाजप

औरंगाबाद विधानसभा मतदारसंघ

१०४ – शिल्लोड – अब्दुल सत्तार, काँग्रेस

१०६ – फुलंब्री – हरिभाऊ बागडे, भाजप

११० – पैठण – संदीपराव भुमरे, शिवसेना


 

विद्य

Bjp MP Raosaheb danve
भाजपचे खासदार रावसाहेब दानवे

मान खासदार – रावसाहेब दानवे, भाजप

भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यामध्ये भाजपला विजय मिळवून दिला आहे. ज्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये शिवसेनेला मोठं करण्यात चंद्रकांत खैरेचा मोठा वाटा आहे. तसाच मराठवाड्यात भाजपला मोठं करण्यात रावसाहेब दानवे यांचा मोठा वाटा आहे. अगदी पक्ष कार्यकर्ता ते खासदार असा त्यांचा प्रवास आहे. रावसाहेब दानवे यांनी २३ पैकी २२ निवडणुकांमध्ये सलग विजय मिळवला आहे. रावसाहेब दानवे हे शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांना भाजप नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी रावसाहेब दानवे यांचे नेतृत्व राजकारणात पुढे आणले. जवखेडा गावातील भाजप शाखाप्रमुखापासून त्यांचा प्रवास सुरु झाला. पक्षाचे तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष असा भाजपमधील प्रवास करत रावसाहेब दानवे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री हा त्यांचा राजकारणातील प्रवास उल्लेखणीय मानला जातो.

रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास ग्रामपंचायतीपासून सुरु झाला. दानवेंनी १९८० साली भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर १९९० आणि १९९५ असं दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून आले. त्यानंतर १९९९, २००४, २००९, २०१४ असं ४ वेळा ते खासदार झाले. तसंच दानवे केंद्रीय ग्राहक हक्क, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री होते. आता या निवडणुकीत देखील याच मतदार संघातून त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

रावसाहेब दानवे – भाजप, ५ लाख ९० हजार ८४९

विलास औताडे – काँग्रेस, ३ लाख ८४ हजार ५११

शरदचंद्र वानखेडे – बसपा, २३ हजार ७११

नोटा – ४,१२७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -