२४ – कल्याण लोकसभा मतदारसंघ

असा आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ...

Kalyan
Kalyan Loksabha Constituency Map
कल्याण लोकसभा मतदारसंघ मॅप

मराठी माणसाचं दाटीवाटीनं वसलेलं उपनगर म्हणूनच हा परिसर ओळखला जातो. कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ उल्हासनगर आणि कळवा मुंब्रा दिवा हा परिसर जोडला गेला आहे. कल्याण-डोंबिवलीची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे. कळवा-मुंब्रा-दिवा या परिसरात बहुभाषिक समाज मोठया प्रमाणात आहे. ठाणे महानगरपालिकेचा भाग, कल्याण – डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद तसंच कल्याण ग्रामीण हा ठाणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत येणारा भाग अशी सरमिसळ होऊन कल्याण लोकसभा मतदारसंघ बनला आहे. शहरी, ग्रामीण तर काही भागांत झोपडपट्टी असं इथलं संमिश्र चित्र आहे. बहुसंख्य मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाज हे या भागाचं वैशिष्ट्य आहे.

मतदारसंघाचा क्रमांक – २४

नाव – कल्याण

संबंधित जिल्हे – ठाणे

प्रमुख उद्योग-व्यवसाय – नोकरदार वर्ग

प्रमुख शेतीपीक – भात

शिक्षणाचा दर्जा – ९०%


मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार(२०१४) – १९ लाख २२ हजार ४६ मतदार

महिला – ८ लाख ७६ हजार ५५१

पुरुष मतदार – १० लाख ४५ हजार ४९५


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

डॉ. श्रीकांत शिंदे – शिवसेना – ५ लाख ५९ हजार ७२३

बाबाजी बळराम पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस – २ लाख १५ हजार ३८०

संजय हेडाऊ – वंचित बहुजन आघाडी – ६५ हजार ५७२

नोटा१३ हजार ०१२


विधानसभा मतदारसंघ

१४० – अंबरनाथ – बालाजी किणीकर – शिवसेना

१४१ – उल्हासनगर – ज्योती कलानी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१४२ – कल्याण – गणपत गायकवाड – अपक्ष

१४३ – डोंबिवली – रविंद्र चव्हाण – भाजप

१४४ – कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर – शिवसेना

१४९ – मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी


Shrikant Shinde
वडील एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत शिंदे यांचा अलगदपणे राजकारणात शिरकाव झाला

विद्यामान खासदार – डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र म्हणूनच डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा हा राजकीयदृष्टया महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कल्याण लोकसभा मतदार संघ हा २००९ च्या निवडणुकीत नव्याने झाला. शिवसेनेचे आनंद परांजपे हे २००९मध्ये तिथून निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांचा केवळ २४ हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन खासदार परांजपे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेने हा मतदार संघ प्रतिष्ठेचा करीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवले. राजकारणाचा कोणताही गंध नसताना श्रीकांत शिंदे हे पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाले. डॉ श्रीकांत शिंदे हे पेशाने एमएस आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

डॉ. श्रीकांत शिंदे – शिवसेना – ४ लाख ४० हजार ८९२

आनंद परांजपे – राष्ट्रवादी काँग्रेस – १ लाख ९० हजार १४३

राजू पाटील – मनसे – १ लाख २२ हजार ३४९

नरेश ठाकूर – आप – २० हजार ३४७

दयानंद किरतकर – बसपा – १९ हजार ६४३

नोटा – ९ हजार ८१५