घरमहा @४८३१ - दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

३१ – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

Subscribe

असा आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ...

मुंबईतल्या सर्वात उच्चभ्रू लोकवस्तीचा या मतदारसंघात समावेश होतो. मलबार हिल, कुलाबा परिसरात विधानभवन, आमदार-खासदारांचे बंगले, मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला, कुलाब्यातल्या नौदलाच्या वसाहती, सीएसटी आणि आसपासचा उच्चभ्रू परिसर या मतदारसंघात येतो. पण त्यासोबतच शिवडी आणि वरळीतल्या काही मध्यमर्गीय वसाहती देखील इथे आहेत. त्यामुळे आधीपासूनच उच्चभ्रू राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा या मतदारसंघावर वरचष्मा राहिला आहे. काँग्रेस आघाडीच्या काळातील केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि त्याआधी त्यांचे वडील मुरली देवरा यांनी या मतदारसंघात १९८४च्या निवडणुकांनंतर ६ वेळा काँग्रेसचा झेंडा फडकावला. जयवंतीबेन मेहतांच्या रुपाने दोन वेळा भाजपनेही मुसंडी मारली होती. मात्र २०१४च्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार या मतदारसंघातून निवडून गेला. एक लाखाहून जास्त मताधिक्याने अरविंद सावंत यांनी विजय नोंदवला. यात मोदी लाटेचा मोठा हात होता. यंदा युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ कुणाला मिळतो यावर इथली गणितं बदलतील.

मतदारसंघाचा क्रमांक – ३१

- Advertisement -

नाव – दक्षिण मुंबई

संबंधित जिल्हे – मुंबई शहर

- Advertisement -

प्रमुख उद्योग-व्यवसाय – नोकरदार

प्रमुख शेतीपीक – NA

शिक्षणाचा दर्जा – ९०%


मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार(२०१४) – ७ लाख ७८ हजार ६६६

महिला मतदार – ३ लाख ४२ हजार ३६६

पुरुष मतदार – ४ लाख ३६ हजार २९२


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

अरविंद सावंत – शिवसेना – ४ लाख २१ हजार ९३७

मिलिंद देवरा – काँग्रेस – ३ लाख २१ हजार ८७०

डॉ. अनिल कुमार – वंचित बहुजन आघाडी – ३० हजार ३४८

नोटा – १५ हजार ११५ 


विधानसभा मतदारसंघ – आमदार

१८२ – वरळी – सुनील शिंदे, शिवसेना

१८३ – शिवडी – अजय चौधरी, शिवसेना

१८४ – भायखळा – वारिस पठाण, एमआयएम

१८५ – मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप

१८६ – मुंबादेवी – अमिन पटेल, काँग्रेस

१८७ – कुलाबा – राज पुरोहित, भाजप


Shivsena MP Arvind Sawant
शिवसेना खासदार अरविंद सावंत

विद्यमान खासदार – अरविंद सावंत, शिवसेना

मोदी लाटेत अरविंद सावंतांना खासदारकीची लॉटरीच लागली होती असं म्हटलं जातं. आधी कधीही शिवसेनेचा खासदार निवडून न आलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला. तत्कालीन विद्यमान केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनाच हरवल्यामुळे अरविंद सावंत यांचा भाव चांगलाच वधारला. इथल्या ६ विधानसभा मतदारसंघांपैकी २ शिवसेना, २ भाजप आणि काँग्रेस-एमआयएमकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. त्यामुळे फक्त मराठी मतांवर अरविंद सावंत निवडून आले अशी परिस्थिती नाही. मात्र, भाजपची वोटबँक पाठिशी आल्यामुळेच हा विजय सोपा झाला होता. आता या मतदारसंघात पुन्हा मिलिंद देवरांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास मोदी लाटेशिवाय अरविंद सावंतांसमोर मोठं आव्हान उभं असेल.

२०१४ मधील आकडेवारी

अरविंद सावंत – शिवसेना – ३ लाख ७४ हजार ६०९

मिलिंद देवरा – काँग्रेस – २ लाख ४६ हजार ०४५

बाळा नांदगावकर – मनसे – ८४ हजार ७७३

मीरा संन्याल – आप – ४० हजार २९८

नोटा – ९ हजार ५७३

मतदानाची टक्केवारी – ५२.४९%

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -