४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

Mumbai
osmanabad loksabha constituency in maharashtra information
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

आई तुळजाभवानीचे मंदिर असलेला उस्मानाबदचा मतदारसंघ आहे. लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांनी मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, काँग्रेसचे दोन आणि शिवसेना एक आमदार आहे. १९५७ पासून इथे काँग्रेस जिकंत होती. मात्र १९९६ साली शिवसेनेचा पहिला विजय झाला त्यानंतर १९९९ आणि २००४ ला पुन्हा शिवसेना जिंकली. २००९ ला राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्यानंतर २०१४ साली पुन्हा एकदा शिवसेना जिंकून आली. २००९ च्या निवडणुकीतही शिवसेनेचे गायकवाड अवघ्या ६,९०० मतांनी पराभूत झाले होते. लोकसभेचा विचार करता हा निसटता पराभव मानला जाईल.

उस्मानाबाद जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो. सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून याची ओळख आहे. मतदारसंघात ऊस आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील या मतदारसंघात झालेल्या आहेत. सिंचनाच्याही अनेक समस्या इथे आहेत. अनेक पायाभूत सोयी सुविधांनी वचिंत असलेल्या या जिल्ह्यात २०१९ साठी अनेक तगडे उमेदवार स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील, शिवसेनेचे विद्यमान खासदार तसेच निंबाळकरही आहेत. भाजपकडून सुरजीतसिंह ठाकूर देखील आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक चुरशीची होईल, हे नक्की.


 

मतदारसंघ क्रमांक – ४०

नाव – उस्मानाबाद

संबंधित जिल्हा – उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या (२०१४) – १७ लाख ५२ हजार ५७४

पुरुष – ९ लाख २९ हजार ८६९

महिला – ८ लाख २२ हजार ६८९


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

ओमप्रकाश भूपालसिंह -शिवसेना- ५ लाख ९६ हजार ६४०

पद्मसिंह पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस -४ लाख ६९ हजार ०७४

अर्जुन सलगर – वंचित बहुजन आघाडी – ९८ हजार ५७९

नोटा – १० हजार ०२४


उस्मानाबाद मधील विधानसभा मतदारसंघ

लातूर

२३९ औसा – बसवराज माधवराव पाटील, काँग्रेस

उस्मानाबाद

२४० उमरगा (SC) – ध्यानराज चौगुले, शिवसेना

२४१ तुळजापूर – मधुकरराव चव्हान, काँग्रेस

२४२ उस्मानाबद – राणा जगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी

२४३ परंडा – राहुल मोटे, राष्ट्रवादी

सोलापूर

२४६ बार्शी – दिलीप सोपल, राष्ट्रवादी

 


Pro Ravindra Gaikwad mp of osmanabad
सोळाव्या लोकसभेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड

विद्यमान खासदार – रवींद्र गायकवाड, शिवसेना

उस्मानाबादमध्ये सर या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले प्रा. रवींद्र गायकवाड यांना पुन्हा एकदा उस्मानाबादची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजप-सेनेची युती झाल्यामुळे गायकवाड यांना गटबाजीला सामोरे जावे लागणार नाही. मात्र ‘खासदार नॉट रिचेबल’ हा आरोप गायकवाड यांना पुसावा लागणार आहे. खासदारांचा मतदारसंघात वावर नाही, हा आरोप पहिल्या वर्षापासून होत आहे. निवडणूक जवळ येताच गायकवाड यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. निष्ठावान शिवसैनिक यावेळी देखील गायकवाड यांना साथ देईल, यात शंका नाही.

रवींद्र गायकवाड यांची कारकिर्द अनेक वादांनी गाजली आहे. इकॉनॉमी क्लासमध्ये बसवले म्हणून त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यामुळे विमान कंपन्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र राजकारण्यांनी आवाज उचलल्यानंतर विमान कंपन्यांनी अनेक नियमात सुधारणा केली.


 

२०१४ मधील मतांची आकडेवारी

रवींद्र गायकवाड, शिवसेना – ६ लाख ७ हजार ६९९

पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादी – ३ लाख ७३ हजार ३७४

पद्मशील ढाले, बसपा – २८ हजार ३०६

रोहन देशमुख, अपक्ष – २६ हजार ८५७

तुकाराम गंगावणे, अपक्ष – १० हजार २१०

नोटा – ४ हजार ६११

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here