घरमहा @४८३४ - पुणे लोकसभा मतदारसंघ

३४ – पुणे लोकसभा मतदारसंघ

Subscribe

पुणे तिथे काय उणे… या युक्तीप्रमाणे हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या प्रगल्भ विचारांचा मानला जातो. पुणे शहरात आयटी क्षेत्राची वाढ झाल्यामुळे येथे सुशिक्षित तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. १९९१, १९९९ आणि २०१४ चा अपवाद वगळता या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने दिर्घकाळ राज्य केले आहे. एस.एम. जोशी, मोहन धारीया यासारख्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांनी २००४ आणि २००९ साली सलग विजय मिळवला होता. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्यामुळे २०१४ ला काँग्रेसने त्यांचे तिकिट कापले आणि डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली. भाजपच्या अनिल शिरोळे यांनी २०१४ ला मोठ्या फरकाने या मतदारसंघात विजय मिळवला.

पुणे हा सुशिक्षित मतदारसंघ असल्यामुळे पारदर्शक आणि स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार २०१९ साठी देण्याचा प्रयत्न सर्वच पक्ष करतील. विशेष म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी सहा विधानसभा भाजपकडेच आहेत. त्यामुळे भाजपला तसा या मतदारसंघात फार मोठा अडथळा नाही.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ३४

नाव – पुणे

- Advertisement -

संबंधित जिल्हा – पुणे

प्रमुख उद्योग-व्यवसाय – उद्योग, आयटी क्षेत्र

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या (२०१४) – १८ लाख
३३ हजार ७९४

पुरुष – ९ लाख ४८ हजार १२६

महिला – ८ लाख ८५ हजार ६६०


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

गिरीश भालचंद्र बापट – भाजप – ६ लाख ३२ हजार ८३५

मोहन जोशी – काँग्रेस – ३ लाख ८ हजार २०७

अनिल नारायण जाधव – वंचित बहुजन आघाडी – ६४ हजार ७९३

नोटा – ११ हजार ००१

उत्तम पांडुरंग शिंदे – बहुजन समाज पार्टी – ४ हजार ७९२


पुणे मधील विधानसभा मतदारसंघ

२०८ वडगाव शेरी – जगदिश मुळीक, भाजप

२०९ शिवाजी नगर – विजय काळे, भाजप

२१० कोथरूड – मेधा कुलकर्णी, भाजप

२१२ पर्वती – सतीश मिसाळ, भाजप

२१४ पुणे कंटोनमेंट – दिलीप कांबळे, भाजप

२१५ कसबा पेठ – गिरीश बापट, भाजप


Anil Shirole MP from Pune
खासदार अनिल शिरोळे

विद्यमान खासदार – अनिल शिरोळे, भाजप

कोणत्याही वादापासून दूर असणारे अजातशत्रू म्हणून शिरोळे यांची ओळख आहे. शिरोळे पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र २०१९ ला पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना पक्षातंर्गतच संघर्ष करावा लागणार आहे. भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पुण्याच्या जागेवर आपला दावा ठोकला आहे. तर पालकमंत्री गिरीश बापट हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदारसंघात भाजपसाठी अनुकूल वातावरण असले तरी शिरोळे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.


 

२०१४ मधील मतांची आकडेवारी

अनिल शिरोळे, भाजप – ५ लाख ६९ हजार ८२५

डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेस – २ लाख ५३ हजार ९४९

दिपक पायगुडे, मनसे – ९३ हजार ४४९

नोटा – ६ हजार ४३६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -