३२ – रायगड लोकसभा मतदारसंघ

रायगड लोकसभा मतदारसंघाची माहिती

Mumbai
32 - Raigad lok sabha constituency
रायगड लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

कोकणातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे. रायगडच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे तर जिल्ह्याच्या काही भागाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. रायगडचे पुर्वीचे नाव कुलाबा असे होते, त्यानंतर त्याचे रायगड असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७,१५२ चौरस किमी आहे. जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पेन, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड असे चार तालुके येतात. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर असे दोन तालुके येतात.

मतदारसंघ क्रमांक – ३२

नाव – रायगड

संबंधित जिल्हे – रायगड आणि रत्नागिरी

प्रमुख उद्योग-व्यवसाय – मासेमारी, शेती

प्रमुख शेतीपीक – भात

मतदारांची संख्या – १५ लाख ३२ हजार ७८१ (२०१४ ची आकडेवारी)

पुरुष – ४९.०९ टक्के

महिला – ५०.९१ टक्के

लिंग गुणोत्तर – १०३७


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

सुनील दत्तात्रेय तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस – ४ लाख ८६ हजार ९६८

अनंत गीते शिवसेना – ४ लाख ५५ हजार ५३०

सुमन भास्कर कोळी वंचित बहुजन आघाडी – २३ हजार १९६

सुभाष जनार्दन पाटील अपक्ष – १२ हजार २६५

नोटा ११ हजार ४९०


रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ –

१९१ – पेण
आमदार – धैर्यशील पाटील (शेतकरी कामगार पक्ष)

१९२ – अलिबाग
आमदार – सुभाष पाटील (शेतकरी कामगार पक्ष)

१९३ – श्रीवर्धन
आमदार अवधुत अनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

१९४ – महाड
आमदार भरत गोगवले (शिवसेना)

रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ –

२६३ – दापोली
आमदार संजय कदम (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

२६४ – गुहाघर
आमदार भास्कर जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)


shiv sena mp anant geete
शिवसेनेचे खासदार अनंत गीते

विद्यामान खासदार – अनंत गीते, शिवसेना

अनंत गीते हे सहाव्यांदा रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. १६ व्या लोकसभेत ते अवजड उद्योग मंत्री म्हणून कार्यभार पाहत आहेत. शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदारांमध्ये अनंत गीते यांचे नाव घेतले जाते. त्यांनी नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. १९८५ ते १९९२ काळात त्यांनी मुंबई महानगरपालिकेत काम केले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. १९९६ मध्ये पहिल्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले होते. आतापर्यंत त्यांनी संसदेच्या अनेक समित्यांमध्ये काम केलेले आहे.


 

२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

अनंत गीते, भाजप – ३ लाख ९५ हजार ९५१

सुनील तटकरे, राकाँपा – ३ लाख ९४ हजार ७

रमेश कदम, शेकाप – १ लाख ९७ हजार ९

यशवंत गायकवाड, बसपा – १० हजार ५०७

सुनील तटकरे, अपक्ष – ९ हजार ८४७

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here