४- रावेर लोकसभा मतदारसंघ

Maharashtra
4 -Raver Lok Sabha Constituency
रावेर लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

रावेर या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ५ आणि बुलढाणा जिल्ह्यामधील एक असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. रावेर… संत ज्ञानेश्वरांची भगिनी संत मुक्ताईची समाधी… देशातलं मोठं रेल्वे यार्ड… महर्षी व्यासांचं मंदिर… तापी, वाघूर नदीचं सानिध्य लाभल्यानं केळीच्या पिकाची बहरलेली बागायती शेती… ही आहेत रावेर लोकसभा मतदारसंघाचं खास वैशिष्ट्यं. निवडक अपवाद वगळता या मतदारसंघात नेहमीच काँग्रेसची पताका फडकत राहिली. मात्र १९९१ पासून आजतागायत या मतदारसंघावर भाजपनं कब्जा केला आहे.

मतदारसंघाचा क्रमांक – ४

नाव – रावेर

संबंधित जिल्हे – जळगाव आणि बुलढाणा

प्रमुख उद्योग-व्यवसाय – केळी निर्यात

प्रमुख शेती पीक – केळी


मतदारसंघ राखीव – खुला

एकूण मतदार – १० लाख १० हजार ८४६

महिला – ४ लाख ५५ हजार ६१७

पुरुष – ५ लाख ५५ हजार २२९


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

रक्षा खडसे – भाजप – ६ लाख ५५ हजार ३८६

डॉ. उल्हास वासुदेव पाटील – काँग्रेस – ३ लाख १९ हजार ५०४

नितिन प्रल्हाद कंडेलकर -वंचित बहुजन आघाडी – ८८ हजार ३६५

नोटा – ९ हजार २१६

डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते – बहुजन समाज पार्टी – ५ हजार ७०५


रावेर विधानसभा मतदारसंघ

जळगाव जिल्हा

१० चोपडा (ST) – चंद्रकांत सोनावणे, शिवसेना

११ रावेर – हरिभाऊ जावळे, भाजप

१२ भुसावळ (SC) – संजय सावकारे, भाजप

१९ जामनेर – गिरीश महाजन, भाजप

२० मुक्ताईनगर – एकनाथ खडसे, भाजप

बुलढाणा जिल्हा

२१ मलकापूर – चैनसुख संचेती, भाजप


रक्षा खडसे, भाजप

विद्यमान खासदार – रक्षा खडसे, भाजप

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे सध्या रावेरचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत तत्कालिन खासदार हरिभाऊ जावळे यांचं जाहीर झालेलं तिकीट कापून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली. बदलत्या राजकीय समीकरणांचा वेध घेत, एकनाथ खडसेंनी त्यासाठी आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावली. मोदी लाटेत रक्षा खडसे प्रचंड मताधिक्यानं विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनीष जैन यांचा ३ लाख १८ हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पुन्हा रक्षा खडसेंना उमेदवारी मिळेल असा कयास आहे. पण माजी खासदार आणि रावेरचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांच्यासह आणखी काहीजण इच्छुक आहेत.

२०१४ मधील मतांची आकडेवारी

रक्षा खडसे, भाजप – ६ लाख ०५ हजार ०६४

मनीष जैन, राष्ट्रवादी काँग्रेस – २ लाख ८७ हजार २७१

दशरथ भांडे, बसपा – २९ हजार ७४६

नोट – ४ हजार २११

मतदानाची टक्केवारी – ६३.३४ टक्के

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here