४४ – सांगली लोकसभा मतदारसंघ

४४ – सांगली लोकसभा मतदारसंघाती माहिती

Mumbai
44 - sangli loksabha constituency
४५ – सातारा लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

सांगली मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. सांगली जिल्हा कृषी आणि औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो. सांगलीमध्ये हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सांगलीला भारताची ‘हळद राजधानी’ म्हणून संबोधले जाते. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये ऊस, द्राक्ष, डाळिंबाच्या बागा आहेत. तसंच बाजरी, भात, ज्वारी, गहू, मका, भूईमूग, सोयाबीन, कापूस, बेदाणे आणि तंबाखूचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. सांगली जिल्ह्याला कृष्णा, वारणा, येरळा या तीन नद्या आहेत. सांगील जिल्ह्याचे नाव ‘सहा गल्ली’ या शब्दापासून विकसित झाले असल्याचे सांगितले जाते. सांगली जिल्ह्यामध्ये धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे अनेक ठिकाणं आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे दुष्काळी तालुके आहेत. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असल्याने सांगलीमध्ये निम्मा लोकव्यवहार हा कानडी भाषेत चालतो. सांगली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौरस किमी आहे. या मतदार संघामध्ये मिरज, सांगली, पळूस-कडेगाव, खानापूर, तासगाव – कवठे- महंकाळ, जत हे सहा विधानसभा मतदार संघ येतात.

या मतदारसंघाचे राजकारण पाहिले तर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात २०१४ मध्ये भाजपने झेंडा फडकावला. भाजपचे संजयकाका पाटील यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विद्यामान खासदार प्रतीक पाटील यांचा पराभव करत ते विजय मिळवला होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सांगली मतदार संघात काँग्रेसचा पराभव झाला. तर विधानसभा निवडणुकीत देखील मोदी लाट कायम होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे चार आमदार निवडून आले आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार विजय मिळवला.

मतदारसंघ क्रमांक – ४४

नाव – सांगली

संबंधित जिल्हे – सांगली

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, उद्योग

प्रमुख शेतीपीक – ऊस आणि इतर

शिक्षणाचा दर्जा – ८२.६२ टक्के

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार – १० लाख ४२ हजार ८६९

महिला-पुरुष मतदार –

पुरुष – ५ लाख ५६ हजार ६९५

महिला – ४ लाख ८६ हजार १६९


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

संजयकाका पाटील – भाजप – ५ लाख ८ हजार ९९५

विशाल प्रकाशबाबू पाटील – स्वाभिमानी पक्ष – ३ लाख ४४ हजार ६४३

गोपीचंद कुंडलिक पादलकर – वंचित बहुजन आघाडी – ३ लाख २३४

आनंद शंकर नलगे (पाटील) – बळीराजा पार्टी – ७ हजार २१३

नोटा – ६ हजार ५८५


सांगली विधानसभा मतदारसंघ

२८१ – मिरज – सुरेश खाडे, भाजप

२८२ – सांगली – धनंजय गाडगीळ, भाजप

२८५ – पळूस-कडेगाव – पतंगराव कदम, काँग्रेस

२८६ – खानापूर – अनिल बाबर, शिवसेना

२८७ – तासगाव – कवठेमहंकाळ – सुमन पाटील (आर. आर. पाटील यांच्या पत्नी), राष्ट्रवादी काँग्रेस

२८८ – जत – विलासराव जगताप, भाजप


MP Sanjaykaka patil
खासदार संजयकाका पाटील

विद्यमान खासदार – संजयकाका पाटील, भाजप

संजयकाका पाटील हे सांगली लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार आहेत. ते १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. संजयकाका पाटील हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र २०१४ च्या निवडणूकाआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. संजयकाका पाटील यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विद्यामान खासदार प्रतीक पाटील यांचा पराभव करत ते विजयी झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून संजयकाका पाटील हेच उमेदवार असतील.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

संजयकाका पाटील – भाजप – ६ लाख ९ हजार ४०२

प्रतिक पाटील – काँग्रेस – ३ लाख ७० हजार ७७८

नानासो बंडगर – बसपा – ११ हजार ३६३

नोटा – ६ हजार ८२

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here