४५ – सातारा लोकसभा मतदारसंघ

सातारा लोकसभा मतदारसंघाची माहिती

Mumbai
45 - satara loksabha constituency
४५ – सातारा लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सातारा जिल्हा हा शेती आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. सातारा जिल्हातल्या माण आणि खटाव तालुके सोडले तर इतर तालुके शेतीने समृध्द आहेत. सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकिय पार्श्वभूमी लाभली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १०,४८४ चौरस किमी आहे. महाराष्ट्रातील सर्वांत उंच थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातच येते. सातारा जिल्ह्यातील गड-किल्ले, नद्या, मंदिर, पर्यटन स्थळ प्रसिध्द आहेत. या मतदारसंघामध्ये वाई, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, सातारा असे ६ तालुके येतात.

मतदारसंघ क्रमांक – ४५

नाव – सातारा

संबंधित जिल्हे – सातारा

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, उद्योग

प्रमुख शेतीपीक – ऊस आणि इतर

शिक्षणाचा दर्जा – 

पुरुष – ९२.०९ टक्के

महिला – ६७.२९ टक्के

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार – ९ लाख ७५ हजार ७०९

महिला-पुरुष मतदार –

पुरुष – ५ लाख १९ हजार १४८

महिला – ४ लाख ५६ हजार ५६१


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

उदयनराजे भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस – ५ लाख ७९ हजार ०२६

नरेंद्र आणासाहेब पाटील – शिवसेना – ४ लाख ५२ हजार ४९८

सहदेव केरप्पा ऐवले – वंचित बहुजन आघाडी – ४० हजार ६७३

नोटा – ९ हजार २२७

सागर शरद भिसे – अपक्ष – ८ हजार ५९३


सातारा विधानसभा मतदारसंघ

२५६ – वाई – मकरंद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस

२५७ – कोरेगाव – शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस

२५९ – कराड उत्तर – श्यामराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

२६० – कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस

२६१ – पाटण – शंभूराजे देसाई, शिवसेना

२६२ – सातारा – शिवेंद्रसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस


udayanraje-bhosale
उदयनराजे भोसले

विद्यमान खासदार – उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस

उदयनराजे भोसले हे सोळाव्या लोकसभा निवडणूकीत खासदार म्हणून निवडून आले. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचेच चालले असे म्हटले जाते. उदयनराजे हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. उच्चशिक्षण घेतलेल्या उदयनराजे भोसले यांनी १९९० मध्ये राजकारणाची वाट धरली. १९९१ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडूण आले. १९९६ साली त्यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकून ते राज्यमंत्री झाले. १९९८-९९ च्या काळामध्ये ते राज्याचे महसूल राज्यमंत्री होते. भाजपला रामराम करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकित ते विजयी झाले. २०१८ मध्ये उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकीतही तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरु आहे.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

उदयनराजे भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस – ५ लाख २२ हजार १५३

पुरुषोत्तम जाधव – अपक्ष – १ लाख ५५ हजार ७८९

राजेंद्र चोरगे – आप – ८२ हजार ३५२

अशोक गायकवाड – रिपाइं – ७१ हजार ६३०

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here