घरमहाराष्ट्रपाठिंबा नाही पण पार्थला निवडून आणण्यास प्रयत्न करू- राज ठाकरे

पाठिंबा नाही पण पार्थला निवडून आणण्यास प्रयत्न करू- राज ठाकरे

Subscribe

पार्थ पवार यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी आणि मनसेचे एकत्र झेंडे बघून कार्यकर्ते पेचात पडले. मात्र, तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी स्पष्ट केले की, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला नाही. पण पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

अजित पवार यांचे सुपुत्र मावळ मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचार सभेदरम्यान राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत मनसे पक्षाचा झेंडा पाहायला मिळाला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान याची चर्चा मावळ लोकसभा मतदार संघात होताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तसे कार्यकर्त्याना जाहीर पाठिंबा देण्याचे आदेश दिलेले नाहीत. यावेळी माजी मंत्री मदनजी बाफना, पार्थ अजित पवार, बबनराव भेगडेसह काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपला पराभूत करण्याची मनसेची खेळी

राज ठाकरे यांनी भाजपा विरोधी भूमिका दोन दिवसांपूर्वीच जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पराभूत करण्यासाठी मनसेने ही भूमिका घेतल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. आज दि. २० रोजी मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांची प्रचार सभा वडगाव येथे होती. यादरम्यान, परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे एकत्र पाहायला मिळाले त्यामुळे चर्चा होत आहे. राज ठाकरे यांनी तर आदेश दिले नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना पडला होता. त्याच वेळी मनसे चे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी स्पष्ट केले की, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला नाही आहे. मात्र, पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -