घरमहाराष्ट्रहर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली; उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका

हर्षवर्धन जाधवांची जीभ घसरली; उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका

Subscribe

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेनेही भाजपकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्ष प्रचाराला लागतात. जनतेकडे मतांचा जोगवा मागत असताना आपल्या प्रचाराची आणि टीकेची पातळी खाली तर उतरत नाही ना? याचा विचारही केला जात नाही. असाच प्रकार औरंगाबादमधील सिल्लोड येथे घडला आहे. माजी मनसे, शिवसेनेचे आमदार आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षातून कन्नडमधून निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधवांनी उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीची टीका केली आहे. जर शिवसेनेला मुस्लिमांचे वावडे आहे तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले? असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक फटकेबाजी दिसतेय. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेनेही भाजपकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली आहे.

सत्तार तुमचा कोण लागतो? – हर्षवर्धन जाधव

“हा हरामखोर हर्षा, याच्यामुळे मुसलमान लोकसभेला निवडून आला. हे शिवसेनेचे भाषण आहे. त्यांच्याकडे दुसरे काही भाषण नाही. आमचा उमेदवार असे करतो, तसे करतो, हे नाही. आमच्या खासदाराने पंचवीस वर्षात काय केले? हे नाही. आमच्या उमेदवाराला किती अक्कल आहे? तो ट्रॅफीक पोलिसला फोन करू शकतो की नाही? हे नाही. तर काय? हर्षामुळे मुसलमान आला ना निवडून! आहो तुम्ही येडे झाले का? त्याला कुठे मतदान करू ऱ्हायले? हे शिवसेनेचे भाषण राहणार आहे उद्या. केलंच तसं भाषण त्यांनी परवा, उद्धव ठाकरेंनी! हिरवा वरती चढवला, भगवा खाली आला. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेतही विचारतो आणि तुमच्या समक्षही शिवसैनिकांना विचारतो. एव्हढंच तुम्हाला मुसलमानांच्याबद्दल वावडे आहे, तर सत्तार तुमचा कोण लागतो? कोण लागतो सत्तार तुमचा? पाहुणा आहे? चुलता आहे? हमारे अब्दुल भाई अभी अभी शिवसेना में आये है!”, असे हर्षवर्धन जाधव आपल्या भाषणात म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मनोज तिवारींचा मनसेला टोला; म्हणे, ‘धडा शिकवणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -