घरमहाराष्ट्रखोलीत अडकलेल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याची अखेर सुटका

खोलीत अडकलेल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याची अखेर सुटका

Subscribe

पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड येथे एका खोलीमध्ये अडकलेल्या दीड वर्षाच्या मुलाची अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटात सुटका केली.

पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड येथे एका खोलीमध्ये (बेडरूम) दीड वर्षाचा मुलगा खेळता खेळता अडकला होता. त्यामुळे चिमुकल्याची आई घाबरली होती. परंतू अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटात दीड वर्षाच्या चिमुकल्याला सुखरूप खोलीतून बाहेर काढले. मुलाची आई घरकाम करत होती तर वडील हे संगणक अभियंता असून ते हिंजवडी येथे कामाला होते. नवीस नगीना हा दीड वर्षाचा (राहणार कस्पटे वस्ती), धनराज पार्क, तिसरा मजला वाकड अस खोलीत (बेडरूममध्ये) अडकला होता. सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी पाऊने पाचच्या सुमारास ही घटना घडली.

चिमुकल्याच्या अडकल्याने आई चिंतेत

याबाबत सविस्तर माहिती समोर आली असून, सोमवारी पाऊने पाचच्या सुमारास नवीस नगीना आणि त्याची आई हे घरात होते. नवीसची आई घरकामात गुंतली असताना नवीस हा खेळताखेळता खोलीत (बेडरूम) मध्ये गेला आणि दरवाजाची कडी लावून घेतली. यानंतर त्याला बाहेर येता येत नसल्याने तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याचा आवाज आईला ऐकू आला. तिने घाबरत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतू दरवाजा उघडत नव्हता. तो आतमधून बंद झाला होता. चिमुकला रडत असल्याने आईने दरवाजाच्या खालच्या फटीतून मोबाईल दिला. त्यामुळे चिमुकल्याचे रडणे थांबले.

- Advertisement -

जवानांनी केली काही मिनिटात सुटका 

अखेर वसाहतीमधील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली. आठ जणांच्या टीमने तातडीने येऊन तिसऱ्या मजल्यावर शिडीच्या सहाय्याने खिडकीपर्यंत पोहचत काठीने कडी काढली आणि चिमुकल्याची सुखरूप सुटका केली. या घटनेमुळे चिमुकल्याची आई घाबरली होती. परंतू अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटातच आई आणि मुलाची भेट घडवून दिली. भगवान यमगर लिडिंग फायरमन, प्रतीक कांबळे, विवेक खांदेवाड, महेंद्र पाठक, रुपेश वानखेडे, अक्षय पाटील, राजनिस भावसर, संदीप जगताप (वाहन चालक) अशी त्यांची नावं आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -