घरमहाराष्ट्रमेल आयडी हॅक करून तब्बल १४ लाख रुपये केले लंपास

मेल आयडी हॅक करून तब्बल १४ लाख रुपये केले लंपास

Subscribe

अॅस्टेक टुलिंग्ज अँड स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आहे.

एका कंपनीचा मेल आयडी हॅक करून तब्बल १४ लाख ५९ हजार रुपये अज्ञातांनी लंपास केले आहेत. अॅस्टेक टुलिंग्ज अँड स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचे नाव आहे. कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी रघुनाथलाल गेरा यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सुरू 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने ऑक्टोबर महिन्यात १८ ते २४ या तारखेच्या कालावधीत अॅस्टेक टुलिंग्ज अँड स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ई-मेल आयडी हॅक केला. त्याद्वारे मॅक स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ई-मेल केला. त्या मेल मधून आरोपीने पंजाब नॅशनल बँकेच्या एका खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार मॅक स्टील कंपनीने त्याच्यावर विश्वास ठेवत तब्बल १४ लाख ५९ हजार रुपये पाठविले अशा पद्धतीने त्याने आर्थिक फसवणूक केली. याबाबत एमआयडीसी भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडचे महापौरपद अडीच वर्षे महिलांसाठी आरक्षित!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -