घरताज्या घडामोडीCorona: रत्नागिरीत १०१ नव्या रुग्णांची नोंद; ३ जणांचा मृत्यू

Corona: रत्नागिरीत १०१ नव्या रुग्णांची नोंद; ३ जणांचा मृत्यू

Subscribe

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून आज १०१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात १०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ३९१ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८३ झाली आहे.

तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात आज तीन जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये खेड तालुक्यातील पुरेखुर्द येथील ४९ वर्षीय रुग्णाचा रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर खेड तालुक्यातील चाकाळे येथील ६६ वर्षाच्या रुग्णाचा रत्नागिरी येथे दाखल करण्यासाठी जात असताना प्रवासा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तर दापोली तालुक्यातील हर्णे या ७० वर्षीय रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

रत्नागिरी जिल्ह्यात आज, मंगळवारी आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरीत ४६, दापोली -८, कळंबणी – ६, कामथे – २७ येथील रुग्णांचा समावेश आहे. तर मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून ३, संगमेश्वर १, कोविड केअर सेंटर समाजकल्याण २, कोविड केअर सेंटर घरडा ५, कोविड केअर सेंटर पेढांबे चिपळूण १४, कोविड केअर सेंटर रीम्झ हॉटेल १ अशा एकूण २६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर होम आयसोलेशनमध्ये असलेले ३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ५९७ झाली आहे.


हेही वाचा – Pune Corona: पुण्यात १,२४० जण कोरोनामुक्त; ९२४ नव्या रूग्णांची नोंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -