राज्यात १०,५५२ नवे रुग्ण, १५८ जणांचा मृत्यू

राज्यात आज १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४०,८५९ वर पोहोचली आहे.

राज्याची आकडेवारी

राज्यात १०,५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,५४,३८९ झाली आहे. राज्यात १,९६,२८८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४०,८५९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात आज १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४८, ठाणे ११, नवी मुंबई मनपा ७, मीरा भाईंदर मनपा २, वसई विरार मनपा १, रायगड ४, पनवेल मनपा ३, नाशिक ९, जळगाव १, पुणे १२, सोलापूर ६, सातारा १५, कोल्हापूर ३, सांगली ५, औरंगाबाद २, लातूर ३, उस्मानाबाद २, नागपूर १२ यांचा समावेश आहे.

आज १९,५१७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १३,१६,७६९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७८,३८,३१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,५४,३८९ (१९.८३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,८०,९५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,१७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.