शिक्षिका रागावल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

शिक्षिका रागावल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे, असा आरोप आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शिक्षेकवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Ahmednagar
Telangana : 19 students commit suicide within a week since Telangana intermediate results were announced
तेंलगणामध्ये १२ वीच्या निकालानंतर १९ विद्यार्थ्यांची आत्महत्या

शिक्षिका रागावल्यामुळे अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील देवठाण गावाच्या एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या विद्यार्थ्याचे नाव सौरभ मच्छिंद्र सोनवणे (वय १७) असं आहे. सौरभच्या वडिलांनी त्याच्या वर्गशिक्षिकेच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शिक्षिका रागवल्यामुळे मुलानं आत्महत्या केली, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, सौरभने केलेल्या तक्रारीनुसार आढळा विद्यालयातील शिक्षिका व्ही. डी. सहाणे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सौरभ मंगळवारी दुपारच्या सुट्टीनंतर शाळेतून निघून गेला होता. त्याचे दफ्तर शाळेतच होते. पाच वाजता त्याच्या वडिलांना तो शाळेत नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर शिक्षक, पालक आणि वर्गातील विद्यार्थ्यांनी सौरभचा शोध घेतला. परंतु, सौरभचा पत्ताच लागला नाही. बुधवारी सौरभच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. अखेर रविवारी संध्याकाळी आढळा नदिपात्रातील एका विहिरीत सौरभचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी सौरभच्या वर्गशिक्षिकेवर आरोप केले आहात. सौरभला दहावीच्या सराव परिक्षेत कमी गुण होते, त्यामुळे त्याच्या वर्गशिक्षिकेने पालकांना घेऊन आणल्याशिवाय वर्गात बसू दिले जाणार नाही, असा दम दिला होता. त्यामुळेच सौरभने आत्महत्या केली, असा आरोप सौरभच्या घरच्यांनी केला आहे.


हेही वाचा – मुलाच्या ‘त्या’ कृत्याच्या नैराश्यग्रस्त बापानी केली आत्महत्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here