घरमहाराष्ट्रशस्त्रक्रियेच्या भीतीने ११ वर्षाच्या मुलीची आत्महत्या

शस्त्रक्रियेच्या भीतीने ११ वर्षाच्या मुलीची आत्महत्या

Subscribe

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि वडिलांमध्ये सुरु असलेले संभाषण प्रियाने ऐकले होते. शस्त्रक्रिया करावी लागणार हे ऐकूण प्रिया खूप घाबरली. त्यानंतर तिने आत्महत्या केली.

बीडच्या अंबाजोगाईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शस्त्रक्रियेच्या भीतीने ११ वर्षाच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. जीभेखाली आलेली गाठ शस्त्रकीया करून काढावी लागणार असल्याची डॉक्टर आणि वडिल यांच्यातील चर्चा मुलीने ऐकली होती. त्यानंतर शस्त्रक्रियेच्या भीतीने तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंबाजोगाईतील परळीवेस भागातल्या शाहूनगरमध्ये दुपारी ही घटना उघडकीस आली.

अशी घडली घटना?

प्रिया सुभाष लोंढे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी प्रियाच्या जिभेखाली गाठ आली होती. त्यावर उपचार करण्यासाठी तिचे वडील तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र जीभेखाली आलेली गाठ शस्त्रक्रियेद्वारेच काढावी लागेल असे डॉक्टरांनी तिच्या वडिलांना सांगितले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि वडिलांमध्ये सुरु असलेले संभाषण प्रियाने ऐकले होते. शस्त्रक्रिया करावी लागणार हे ऐकूण प्रिया खूप घाबरली.

- Advertisement -

ओढणीने घेतला गळफास

शस्त्रक्रिया करावी लागणार या कल्पनेने घाबरलेल्या प्रियाने हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर आत्महत्या केली. राहत्या घरी ओढणीने गळफास लावून प्रियाने आत्महत्या केली. प्रियाने गळफास लावलेले माहिती पडताच तिच्या कुटुंबियांनी आरडाओरडा करत शेजारच्यांना बोलावून घेतले. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी प्रियाला मृत घोषीत केले. या घटनेप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

लग्नाला नकार दिल्यामुळे बोरिवलीत पोलिसाची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -