घरCORONA UPDATECorona: आज औरंगाबाद जिल्ह्यात ११३ कोरोनाबाधितांची वाढ!

Corona: आज औरंगाबाद जिल्ह्यात ११३ कोरोनाबाधितांची वाढ!

Subscribe

आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील १०२ तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात ११३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजार ५७७वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५ हजार ६१ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ३ हजार १६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामधील नऊ रुग्णांच्यी सिटी एंट्री पॉइंट येथे अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी केली होती. त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील १०२ रुग्ण तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात रविवारी ७ हजार ८२७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १७३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत राज्यात २ लाख ५४ हजार ४२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी १ लाख ४० हजार ३२५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर मृतांचा आकडा १० हजार २८९ इतका झाला आहे.

- Advertisement -

देशात सातत्याने नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात २४ तासांत २८ हजार ७०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५०० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ७८ हजार २५४वर पोहोचला असून मृतांचा आकडा २३ हजार १७४ झाला आहे.


हेही वाचा – बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर; ३४ तासांत ११ सेलिब्रिटी पॉझिटिव्ह

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -