राज्यात ११,४१६ नवे रुग्ण, ३०८ जणांचा मृत्यू

राज्यात ११,४१६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,१७,४३४ झाली आहे.

maharashtra reports

राज्यात ११,४१६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,१७,४३४ झाली आहे. राज्यात २,२१,१५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३०८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ४० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

राज्यात २,२१,१५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३०८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ६, कल्याण डोंबिवली मनपा २, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा ४, रायगड १, नाशिक १६, अहमदनगर २४, जळगाव ६, पुणे ३८, पिंपरी चिंचवड मनपा ८, सोलापूर २२, सातारा २६, कोल्हापूर १, सांगली १०, औरंगाबाद ४, लातूर ५, उस्मानाबाद ७, नांदेड २, अमरावती ६ आणि नागपूर १८ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३०८ मृत्यूंपैकी १६८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८० मृत्यू पुणे २६, सातारा ७, अहमदनगर ७, बीड ६, नागपूर ६, नाशिक ६, सोलापूर ६, भंडारा २, चंद्रपूर २, गोंदिया २, जळगाव २, नांदेड २, यवतमाळ २, अकोला १, औरंगाबाद १, रायगड १ आणि सांगली १ असे आहेत.

आज २६,४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १२,५५,७७९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७५,६९,४४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,१७,४३४ (२०.०५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,६८,०५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.