पुणे : कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार; ५२४ रुग्णांचा मृत्यू

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजारच्यावर गेली असून आतापर्यंत ५२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Pune
highest single day spike of 178 deaths reported in maharashtra today

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार ४३८ झाली आहे. तर पुणे विभागातील ६ हजार ४८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ४ हजार ४२८ अॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत ५२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, २५८ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुण्यातील ५ हजार ४१२ रुग्ण झाले बरे

पुणे जिल्ह्यातील ८ हजार ९१६ बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित ५ हजार ४१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ३ हजार १११ आहे. कोरोनाबाधित एकूण ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, २२३ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. तर शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ३५२ ने वाढ झाली आहे.

राज्यात तीन महिन्यात ८० हजार कोरोना रुग्ण

राज्यात शुक्रवारी २४३६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून करोनाबाधित रुग्णांची संख्या ८० हजार २२९ झाली आहे. तसेच १३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या २८४९ वर पोहोचली आहे. शुक्रवारी १४७५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने, राज्यात आजपर्यंत ३५ हजार १५६ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान, करोना निदानासाठी सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५,२२,९४६ नमुन्यांपैकी ८०,२२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे.

राज्यात सध्या कंटेनमेंट ३४७९ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,०२६ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.१८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,४५,९४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३०,२९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – राज्यात तीन महिन्यात ८० हजार करोना रुग्ण