घरमहाराष्ट्रराज्यात ११,४४७ नवे रुग्ण, ३०६ जणांचा मृत्यू

राज्यात ११,४४७ नवे रुग्ण, ३०६ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात ११,४४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १५,७६,०६२ झाली आहे. राज्यात १,८९,७१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात ११,४४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १५,७६,०६२ झाली आहे. राज्यात १,८९,७१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३०६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४१५०२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात ३०६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३७, ठाणे १०, नवी मुंबई मनपा ४, मीरा भाईंदर मनपा ४, वसई विरार मनपा ५, रायगड ४, नाशिक ८, अहमदनगर ४, जळगाव ५, पुणे ५६, पिंपरी चिंचवड मनपा १७, सोलापूर ५, सातारा ७, कोल्हापूर १२, सांगली १५, औरंगाबाद ३, लातूर ४, उस्मानाबाद ६, नांदेड ६, अमरावती ३, नागपूर १५ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३०६ मृत्यूंपैकी १११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२५ मृत्यू पुणे ३६, मुंबई २४, कोल्हापूर १०, रत्नगिरी १०, सांगली १०, सोलापूर ६, वर्धा ५, रायगड ५, बुलढाणा ३, नागपूर ३, नांदेड ३, ठाणे ३, अकोला २, भंडारा १, जालना १, नाशिक १, सातारा १ आणि पालघर १ असे आहेत.

- Advertisement -

आज १३,८८५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १३,४४,३६८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७९,८९,६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,७६,०६२ (१९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,३३,५२२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,४०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -