घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये ९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

नाशिकमध्ये ९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

Subscribe

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि.७) दिवसभरात 117 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 17,नाशिक शहर 99 आणि जिल्ह्याबाहेरील एका रूग्णाचा समावेश आहे. दिवसभरात ९ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण ३ आणि नाशिक शहरातील ६ रूग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या आरोग्य विभागाने संशयित कोरोना रूग्णाला ताब्यात घेतले असता त्याने आरोग्य पथकाला गुंगारा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. याप्रकरणी नागरिकांनी कोरोनाबदल भिती बाळगू नये, लक्षणे दिसून येताच आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात एकूण 5 हजार 704 बाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात 3 हजार १७३ रूग्ण आहेत.

जिल्ह्यासह नाशिक शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे शहरात कोविड केअर सेंटर, कोरोना हेल्थ रूग्णालय आणि कोरोना रूग्णालये सुरू करण्यात आली आहेत. कोरोनासदृश्य लक्षणे दिसताच कोरोना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. परिणामी, रूग्णांना वेळेत उपचार मिळत असून ते कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यात आजवर 3 हजार 366 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 742, नाशिक शहर 1606, मालेगाव 896 आणि जिल्ह्याबाहेरील 92 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारअखेर २ हजार ७५ बाधित रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण 495, नाशिक शहर 1424, मालेगाव 125 आणि जिल्ह्याबाहेरील 31 रूग्णांचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात 619 संशयित रूग्ण दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय 16, नाशिक महापालिका रूग्णालय 346, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 11, मालेगाव रूग्णालय 10, नाशिक ग्रामीण रूग्णालयात 236 रूग्ण दाखल झाले आहेत.

- Advertisement -

शहरात ६ बाधितांचा मृत्यू

नाशिक शहरात आज ६ बाधितांचा मृत्यू झाला. हशमत मंजिल, नासिक रोड येथील ५४ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे ६ जुलै रोजी मृत्यू झाला. तारवाला नगर, नाशिक येथील ६० वर्षीय पुरुषाचा ६ जुलै रोजी मृत्यू झाला. सुपुष्प बंगला,दत्तमंदिर रोड, देवळाली गाव, नाशिक येथील ७४ वर्षीय पुरुषाचा ५ जुलै रोजी मृत्यू झाला. गंगोत्री अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी नाशिक येथील ६९ वर्षीय महिलेचा ५ जुलै रोजी मृत्यू झाला. वरुण कृपा सोसायटी, मदिना चौक, नाशिक येथील ७४ वर्षीय महिलेचा ६ जुलै रोजी मृत्यू झाला. देवळाली गाव, नाशिक येथील ६० वर्षीय पुरुषाचा ७ जुलै रोजी मृत्यू झाला.

१२ प्रतिबंधित क्षेत्र निर्बंधमुक्त

शहरातील १२ प्रतिबंधित क्षेत्रात १४ दिवसांत नवीन रूग्ण आढळून न आल्याने आरोग्य विभागाने निर्बंधमुक्त केले आहेत. निर्बंधमुक्त क्षेत्र पुढीलप्रमाणे : सिताराम रो-हाऊस-अयोध्यानगरी-हिरावाडी, प्रणव बंगला-भाऊसाहेब हिरेनगर-हिरावाडी, मोहिनी घनश्याम सोसायटी-दत्त चौक-गंगापूररोड, साई समर्थ संकुल-गोकुळनगरी, शांतीवन सोसायटी-शरणपूररोड, रामरथी बंगला-सातपूर, देवकी बंगला-खुटवडनगर, विजया सोसायटी-राजीवनगर, सरिता सोसायटी-काठेगल्ली, प्रभात पूजा सोसायटी-दिंडोरी रोड, सानिका सोसायटी-हनुमानवाडी, भार्गव सोसायटी-हिरावाडी.

- Advertisement -

नाशिक कोरोना अपडेट

पॉझिटिव्ह रूग्ण-5704(मृत-293)
नाशिक ग्रामीण-1298 (मृत-61)
नाशिक शहर-3१७३ (मृत-1४३)
मालेगाव शहर-1097 (मृत-76)
जिल्ह्याबाहेरील-13६ (मृत-13)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -