नाशकात १२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

Nashik
Three positives on the same day in Nandgaon

नाशिक प्रशासनास सोमवारी (दि.१) १२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये नाशिक शहर ८, सिन्नर तालुक्यातील सोनांबे व पिंपळे, रायांबे (ता.इगतपुरी) आणि मनमाड येथील प्रत्येक एकाचा समावेश आहे. आता जिल्ह्यात १ हजार २३६ करोनाबाधित रुग्ण असून एकट्या नाशिक शहरात २१८ रुग्ण बाधित आहेत. १ हजार २३६ पैकी ८४६ रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १०६, नाशिक शहर ८१, मालेगाव ६१६, जिल्ह्याबाहेरील ४३ आहेत. जिल्ह्यात ३१७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मालेगाव पाठोपाठ नाशिक शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी दिवसरात जिल्ह्यात १२ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अमृतधाम येथील बिडी कामगारनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, सातपूर येथील २१ वर्षीय युवती, ६१ वर्षीय महिला, डिसोझा कॉलनीतील ३२ वर्षीय पुरुष, पंचवटीतील १९ व ४० वर्षीय पुरुष व ३८ वर्षीय महिला, वडाळारोड येथील ६० वर्षीय पुरुषाचा यवतमाळ येथे मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले आहे.

जिल्ह्यातील १ हजार २३६ बाधित रुग्णांपैकी ८४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उर्वरित ३१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ६८, नाशिक शहर १२८, मालेगाव १०८ आणि जिल्ह्याबाहेरील १३ जणांचा समावेश आहे. रायांबे (ता.इगतपुरी) येथील २९ वर्षीय पुरुष बाधित आहे. तो अंधेरीमधील एमआयडीसीतील कंपनीमध्ये नोकरीला असून प्रवासादरम्यान त्यास लागण झाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने त्याच्या संपर्कातील ११ जणांना क्वारंटाईन केले असून रायांबे गाव सील केले आहे.

५२४ अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात सोमवार अखेर ११ हजार ८०० संशयित रुग्णांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १२३६ पॉझिटिव्ह, १ हजार ४० निगेटिव्ह असून ५२४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण २६, नाशिक शहर १५५, मालेगाव शहर ३४३ आहेत.

सोमवारी १०३ रुग्ण दाखल
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १०३ संशयित रुग्ण उपचारार्थ विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय ७, नाशिक महापालिका रुग्णालय २२, डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ४, मालेगाव महापालिका रुग्णालय १९, नाशिक ग्रामीण रुग्णालय ५१ रुग्ण आहेत.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रुग्ण-१२२४ (मृत ७३)
नाशिक शहर – २१८ (मृत ९)
नाशिक ग्रामीण – १79 (मृत ५)
मालेगाव – ७७९ (मृत ५५)
अन्य – 60 (मृत ४)