घरताज्या घडामोडीCorona: औरंगाबादमध्ये १२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण आकडा ६६४४वर!

Corona: औरंगाबादमध्ये १२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण आकडा ६६४४वर!

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. रविवारी सकाळी जिल्ह्यात १२८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार ६४४वर पोहोचला आहे. आज सकाळी नोंद झालेल्या रुग्णांमध्ये ८५ रुग्ण शहरातील तर ४३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. या एकूण रुग्णांमध्ये ६५ पुरुष रुग्ण तर ६३ महिला रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ३ हजार २४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ हजार १०० जणांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात ३०० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

मुंबई, पुणे, औरंगाबाद या महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबईत काल १ हजार १८० कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ६८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित आकडा ८२ हजार ८१४वर पोहोचला आहे. या वाढत्या कोरोनाबाधितांच्या रुग्णांमुळे राज्यातील एकूण आकडा २ लाख पार झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण राज्यात आढळले आहेत. त्यानंतर तामिळनाडू राज्यात आढळले असून तेथील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांहून अधिक आहे.


हेही वाचा – Corona Update: देशात २४ तासांत सर्वाधिक २४, ८५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -