Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र खेळताना किरकोळ वाद; डोक्यात बॅट मारल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

खेळताना किरकोळ वाद; डोक्यात बॅट मारल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

याप्रकरणी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

पेण शहरात किरकोळ वाद झाल्याने क्रिकेट खेळणं चांगलंच जीवावर बेतल्याचा प्रकार समोर आला आहे. पेण शहरातील कुंभार आळी परीसरात क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादानंतर डोक्यात बॅट मारल्याने एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. प्रेम दळवी असे या मुलाचे नाव असून याप्रकरणी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पेण तालुक्यात दुखः व्यक्त करण्यात येत आहे.

असा घडला प्रकार

मंगेश दळवी यांचा १३ वर्षीय मुलगा प्रेम दळवी हा सोसायटीतील मित्रांसोबत शनिवारी संध्याकाळी सोसायटीत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना सुमारे साडे पाचच्या सुमारास मुलांमध्ये शुल्लक वाद झाला. या किरकोळ वादातून खेळणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने प्रेमच्या डोक्यात बॅट मारली. या बॅटचा मार प्रेमच्या डोक्याच्या मागील बाजूस बसल्याने गंभीर दुखापत झाली आणि प्रेम जागीच खाली कोसळला. यानंतर प्रेमला तातडीने पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी प्रेमला मृत असल्याचे घोषित केले, अशी माहिती पोलिसांकडून मिळाल्याचे समजतेय.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बॅट मारणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

- Advertisement -