राज्यात १३,३९५ नवे रुग्ण, ३५८ जणांचा मृत्यू

राज्यात १३,३९५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४,९३,८८४ झाली आहे.

राज्याची आकडेवारी

राज्यात १३,३९५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४,९३,८८४ झाली आहे. राज्यात २,४१,९८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३९,४३० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

राज्यात ३५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ६, कल्याण डोंबिवली मनपा ३०, मीरा भाईंदर मनपा ११, वसई विरार मनपा ५, रायगड २, नाशिक ७, अहमदनगर १५, जळगाव ३, पुणे ५२, पिंपरी चिंचवड मनपा ९, सोलापूर २, सातारा २१, कोल्हापूर ७, सांगली १०, औरंगाबाद ६, लातूर ४, उस्मानाबाद ३, नांदेड ७, अमरावती १, नागपूर ३१ आणि अन्य ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३५८ मृत्यूंपैकी १८७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११६ मृत्यू पुणे ३५, ठाणे २८, वर्धा १८, नागपूर १२, परभणी ६, बीड ३,कोल्हापूर २,नाशिक २, उस्मानाबाद २, सातारा २, नांदेड २, रत्नागिरी २, जळगाव १ आणि सांगली १ असे आहेत.

आज १५,५७५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १२,१२,०१६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१. १३ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७४,०४,२३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,९३,८८४ (२०.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,८४,२०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,३२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.