घरमहाराष्ट्रपरराज्यातून येणार्‍यांना १४ दिवस होम क्वारंटाईन सक्तीचे

परराज्यातून येणार्‍यांना १४ दिवस होम क्वारंटाईन सक्तीचे

Subscribe

परराज्यातून मुंबईत येणार्‍यांना सक्तीने १४ दिवस होम क्वारंटाईन (गृह अलगीकरणात) राहावे लागणार आहे. तसे आदेश मुंबई महापालिकेने काढले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर उपाय म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.ज्या शासकीय अधिकार्‍यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचे असल्यास त्यांनासुद्धा परवानगी घ्यावी लागणार आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेले आहेत. आता काही लोक पुन्हा परत येत असल्याने महापालिकेने ही नियमावली प्रसिद्ध केली आहे. कोरोना व्हायरस विरुद्ध खबरदारी म्हणून मुंबईत येणार्‍या सर्व प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाईन करणे अनिवार्य आहे. शासकीय अधिकार्‍यांना यातून सूट आवश्यक असल्यास [email protected] वर कामकाजाच्या तपशिलासह दोन दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना महापालिका प्रशासनाने क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले होते. त्यावरून बृहन्मुंबई महापालिकेवर टीका करण्यात आली होती. या प्रकरणानंतर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. महापालिकेने क्वारंटाइनच्या नियमासंदर्भात नवीन आदेश काढले आहेत.

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या आदेशातील क्वारंटाइनच्या नियमाचा हवाला देत महापालिकेने मुंबईत येणार्‍या प्रत्येक नागरिकाने १४ दिवस होम क्वारंटाइन राहणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. अशा काही घटना समोर आल्या आहेत की, मुंबईत दाखल झाल्यानंतर काही शासकीय अधिकारी ओळखपत्र दाखवून क्वारंटाइनमधून सुटका मिळवत आहेत. पण, यापुढे ज्या शासकीय अधिकार्‍यांना मुंबईत आल्यानंतर कामासाठी बाहेर पडायचे असेल, तर त्यांनी परवानगी घ्यावी. दोन दिवस अगोदर तशी विनंती महापालिकेकडे करावी, असे महापालिकेने आपल्या आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -