घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून; संशयित आरोपी फरार

पिंपरी-चिंचवडमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून; संशयित आरोपी फरार

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, खून झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत काही अघटित तर घडलं नाही, असा संशय भोसरी पोलिसांनी व्यक्त केला असून शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होणार आहे. हा खून सावत्र वडीलाने केल्याचा संशय भोसरी पोलिसांना व्यक्त केला असून फरार वडिलांचा शोध घेणे सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. मयत मुलीची बहीण शाळेतून घरी आली. तेव्हा, घराला बाहेरून कुलूप होत. त्यामुळं बराच वेळ तिने वाट पाहिली त्यानंतर इतर व्यक्तीना फोन ही केले परंतु काहीच होत नव्हतं. अखेर कुलूप तोडलं आणि गंभीर घटना समोर आली. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून केल्याचं संशय भोसरी पोलिसांना आहे. दरम्यान, सावत्र वडील फरार असून त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -