घरमहाराष्ट्रनिवडणूक काळातील शांततेसाठी १५० जण तडीपार

निवडणूक काळातील शांततेसाठी १५० जण तडीपार

Subscribe

जिल्हा प्रशासनाला पोलिसांचा प्रस्ताव

आगामी लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी रायगड जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांविरोधात कारवाईची मोहिम होती घेतली आहे. ज्यांच्याकडून निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा 150 जणांविरोधात तात्पुरत्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई वाढवली आहे. निवडणुकीच्या काळात शांतता राहावी, यासाठी तात्पुरत्या तडीपारीची कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे. याबाबतचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठवण्यात आले असून ही तडीपारी पाच ते सहा दिवसांची राहाणार आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाने 150 जणांविरोधात तात्पुरते तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकार्‍यांकडे सादर केले आहेत. यानुसार संबंधितांवर यापूर्वी असलेले दाखल गुन्हे, यापूर्वी घडलेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून करण्यात आलेली विघातक कृत्ये लक्षात घेता हे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. लवकरच या प्रश्नांवर उपविभागीय अधिकारी निर्णय घेतील.
– डॉ. अनिल पारस्कर, पोलीस अधिक्षक, रायगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -