घरताज्या घडामोडीCorona: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांहून अधिक!

Corona: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांहून अधिक!

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ३ हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ८ हजार पार झाला आहे. १ हजार ३६१ संशयित रुग्णांच्या स्वॅबपैकी १५९ रुग्णांचा अहवाल आज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार १०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील ११२ आणि ग्रामीण भागातील ४७ रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ४ हजार ४६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ३४२ रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या ३ हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर औंरगाबादमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद शहर आणि वाळुंज परिसरात हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १० जुलै ते १८ जुलै दरम्यान कडक निर्बंध लागू असणार आहेत. काल राज्यात ७ हजार ८६२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून २२६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ३८ हजार ४६१वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ९ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाचं संकट आणखी गडद, देशात २४ तासांत रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -