घरमहाराष्ट्रठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातून १६ अर्ज बाद

ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातून १६ अर्ज बाद

Subscribe

उमेदवारी अर्जाच्या छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली. अधिकृत उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने सगळयाच उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन मतदारसंघातून १२ उमेदवारांचे १६ अर्ज छाननीच्यावेळी बाद झाले आहेत. त्यामुळे तीन्ही मतदार संघात उमेदवार आहेत. मात्र १२ एप्रिल रेाजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक मतदार संघातील एकूण उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्जाच्या छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली. अधिकृत उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने सगळयाच उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

आजीमाजी खासदारांचा सामना

ठाणे मतदार संघात २९ उमेदवारांनी ३० उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ४ उमेदवारांचे ५ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे, २५ उमेदवार पात्र ठरले आहेत. ठाण्यात महायुतीचे उमेदवार खासदार राजन विचारे विरूध्द आघाडीचे आनंद परांजपे असा आजीमाजी खासदारांचा सामना रंगणार आहे. भिवंडी मतदार संघात २२ उमेदवारांनी २९ अर्ज सादर केले. छाननीच्यावेळी ४ उमेदवारांचे ५ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे १८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

- Advertisement -

भिवंडीत चुरशीची लढत

भिवंडीत महायुतीचे कपिल पाटील व काँग्रेसकडून सुरेश टावरे तसेच शिवसेनेचे सुरेश उर्फ बाळयामामा म्हात्रे यांनी बंडखोरी केल्याने भिवंडीत चुरशीची लढत होणार आहे. कल्याण मतदार संघात ३६ उमेदवारांनी ५० अर्ज सादर केले होते. त्यापैकी ४ उमेदवारांचे ६ अर्ज अवैध ठरले. महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे आणि आघाडीचे बाबाजी पाटील यांच्यात खरा सामना रंगणार आहे.

अपुर्ण माहिती असल्याने अर्ज बाद

२३ – भिवंडी लोकसभा मतदार संघात २२ उमेदवारांनी २९ नामांकन दाखल केले होते. बुधवारी झालेल्या अर्ज छाननीत चार उमेदवारांचे उमेदवारी तांत्रिक कारणांनी बाद ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये संजय काशिनाथ पाटील, देवेश (बबलू) पाटील, राजू सोनवणे आणि मंसूर अंतुले या चार उमेदवारांनी नामांकन सादर करताना अपुर्ण माहिती सादर केल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून यातील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या १२ एप्रिलपर्यंत किती उमेदवार अर्ज माघारी घेतात त्यावर निवडणूकीची खरी रंगत ठरणार आहे.

- Advertisement -

भिवंडी मतदार संघातील रिंगणात उरलेले उमेदवार

निवडणूकीसाठी आता काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश टावरे, भाजप, शिवसेना, रिपाई युतीचे कपिल पाटील, व्हीबीएचे डॉ.अरुण सावंत, बाळाराम विठ्ठल म्हात्रे (अपक्ष ), दिपक पंढरीनाथ खांबेकर (अपक्ष ), योगेश मोतीराम कथोरे (बहुजन महापार्टी ), फिरोज अब्दुल रहीम शेख ( अपक्ष ), कपिल जयंत पाटील (अपक्ष ), डॉ.नूरुद्दिन निजामुद्दीन अन्सारी (समाजवादी पक्ष ), सुहास धनंजय बोंडे (अपक्ष ), कपिल यशवंत ढमणे (अपक्ष ), संजय गणपत वाघ ( भारतीय ट्रायबल पार्टी ), विश्वनाथ रामचंद्र पाटील ( अपक्ष ), सुरेश काशिनाथ टावरे ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) ,नवीद हसन मोमीन ( अपक्ष ) ,सुरेश (बाळ्या मामा ) म्हात्रे ( अपक्ष ), मुमताज अब्दुल सत्तार ( बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ), नितेश जाधव आदी १८ उमेदवार रिंगणात उरले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -