सावधान! पुन्हा आढळले स्वाईन फ्ल्यूचे १७ रुग्ण

Mumbai
swine flu h1n1
फाईल फोटो

मुंबई पाठोपाठ आता पुणे शहरातही लोकांना स्वाइन फ्लूची लागण होते आहे. पुण्यामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, शहरात नवीन १७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. चिंताजनक बाब म्हणजे एकीकडे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये तत्काळ जागा उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे काही भागांत रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक करत आहेत. दरम्यान स्वाईन फ्लूच्या धर्तीवर लोकांनी सर्दी, ताप, खोकला झाला असल्याल किंवा घसा दुखत असल्यास विलंब न करता त्वरित तपासणी करून घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.


धक्कादायक: मुलाला ‘गे’ चिडवल्यामुळे, शिक्षिकेने केली बेदम मारहाण

डेंग्यू आणि मलेरिया या आजाराने सध्या डोके वर काढले असल्यामुळे अशक्तपणा, अंगदुखी, गुडघेदुखी असल्यास आवश्यक त्या तपासण्या करून घ्याव्यात, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. शहरात मागील आठ दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. रविवारी सुटी असली तरीही दिवसभरात केवळ ११७ व्यवतींची तपासणी करण्यात आली. त्यात स्वाइन फ्ल्यूचे १७ रुग्ण आढळले असून, ५५ व्यक्ती संशयित म्हणून आढळून आल्या आहेत. त्यांना टॅमी पलूचे औषध देऊन घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, अतिदक्षता विभागात २९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ६५ जणांवर वॉर्डमध्ये उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.


वाचा: ‘मुहूर्त’ बघूनच चोरी करणारे दोन भामटे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here