संतापजनक! १० रुपयांचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार

पाण्याची भरलेले कॅन आणल्यास दहा रुपये देतो, असे आमिष दाखवून एका १९ वर्षीय भोळसर मुलीवर बलात्कार केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

rape case
प्रातिनिधिक छायाचित्र

दिवसेंदिवस मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज एक घटना ऐकायला येत असून नुकतीच एक घटना समोर आली आहे. पाण्याची भरलेले कॅन आणल्यास दहा रुपये देतो, असे आमिष दाखवून एका १९ वर्षीय भोळसर मुलीवर बलात्कार केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपी भगवान किसन बलांडे (५१) याला अटक करण्यात आली असून त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस. निंबाळकर यांनी दिले आहेत.

नेमके काय घडले?

या प्रकरणात पीडितेच्या आईने फिर्याद दिली असून पीडितेला विश्वासात घेवून विचारपूस केली असता बलांडे याने बळजबरी बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. १० रुपयांचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात वडोदबाजार पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून आरोपीची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे सहाय्यक लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी केली असून न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा – आता शासकीय प्रयोगशाळांसाठी RTPCR कोरोना चाचणी होणार १४८ रुपयात