घरमहाराष्ट्रसंभाजी भिडेंच्या बैठकीत राडा; २० आंदोलनकर्त्यांना अटक

संभाजी भिडेंच्या बैठकीत राडा; २० आंदोलनकर्त्यांना अटक

Subscribe

शिवप्रतिष्ठानतर्फे जालन्यात आर्य समाज मंदिरात संभाजी भिडेचं मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जालन्यातील दलित संघटना आणि संभाजी ब्रिगेडने विरोध केला.

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे. जालन्यात सुरु असलेल्या संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमा दरम्यान दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा करत संभाजी भिडे चले जावच्या घोषणा करण्यात आल्या. या दलित कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. शिवप्रतिष्ठानतर्फे जालन्यात आर्य समाज मंदिरात संभाजी भिडेचं मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जालन्यातील दलित संघटना आणि संभाजी ब्रिगेडने विरोध केला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात शिरुन घोषणाबाजी केली. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या संघटनांनी संभाजी भिडेंना जिल्हा बंदी करावी अशी मागणी केली आहे.

जालन्यातल्या आर्य समाज मंदिरात संभाजी भिडे यांची बैठक होती. त्याठिकाणी दलित संघटना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी येऊन घोषणाबाजी करत राडा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र कार्यकर्ते घोषणाबाजी करत राहिले. दरम्यान, बैठकस्थळी उपस्थित असलेले संभाजी भिडे यांचे कार्यकर्त्ये आणि घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते एकमेकात भिडू नये यासाठी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी २० आंदोलकांना अटक केली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -